शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निपथच्या भरती नियमांमध्ये मोठा बदल, आता ITI-पॉलिटेक्निक उत्तीर्णही करू शकणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:54 IST

केंद्रातील एनडीए सरकारनं गेल्या तीन वर्षात लष्करातील जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती.

नवी दिल्ली-

केंद्रातील एनडीए सरकारनं गेल्या तीन वर्षात लष्करातील जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. सरकारनं आता अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. याअंतर्गत ITI-पॉलिटेक्निक उत्तीर्ण देखील अर्ज दाखल करू शकणार आहेत. 

लष्करानं अग्निपथ भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पात्रता निकष वाढवण्यात आले आहेत. प्री स्किल्ड युवा देकील अग्निपथ भरतीत सहभाग घेऊ शकतात. आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण टेक्निकल ब्रांचमध्ये भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात. यातून प्री-स्किल्ड युवांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. इतकंच नाही तर यामुळे ट्रेनिंगसाठीचा कालावधी देखील कमी होणार आहे. या मोठ्या बदलानंतर आता आणखी जास्त युवा उमेदवारांना योजनेत सामील होता येणार आहे. 

१६ फेब्रुवारीपासून अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्करात अग्नीवीरांच्या भरतीसाठीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. अग्निपथ भरती वर्ष २०२३-२४ साठी अविवाहित पुरुष उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in येथे भेट देऊ शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठीची १५ मार्च २०२३ ही अंतिम मुदत आहे. तर निवड परीक्षा १७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

नोटिफिकेशननुसार अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क, स्टोअर किपर, ट्रेड्समॅनच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अग्नीवीर निवड प्रक्रियेत नुकतंच बदल करण्यात आले होते. यानुसार उमेदवारांना सर्वात आधी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना फिजिकल टेस्ट साठी निमंत्रित केलं जाईल. 

अर्जासाठीची पात्रता काय?१६ फेब्रुवारीला जारी नोटिफिकेशननुसार अग्नीवीर (जनरल ड्युटी) पदासाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर अग्नीवीर (टेक्निकल) यासाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्नीवीर क्लर्क (स्टोअर कीपर) पदासाठी कमीतकमी ६० टक्क्यांनी १२ उत्तीर्ण उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. अग्नीवीर ट्रेड्समनपदासाठी ८ वी आणि १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात. आता नव्या बदलानुसार आयआयटी-पॉलिटेक्निक उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.