शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

 काश्मीरमध्ये लष्कराचा टॉप कमांडर आयुब ललहारीला कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 20:09 IST

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने व्यापक  मोहीम उघडली आहे. आज पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील बांदेरपोरा भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर आयुब ललहारी याला कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर, दि. 16 -  काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने व्यापक  मोहीम उघडली आहे. आज पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील बांदेरपोरा भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर आयुब ललहारी याला कंठस्नान घातले आहे. याआधी रविवारी झालेल्या चकमकीत लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा केला होता.  या चकमकीबाबत माहिती देताना जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य म्हणाले की, आयूब ललहारीचा खात्मा हे भारतीय लष्कराच्या मोहिमेला मिळालेले मोठे यश आहे. ललहारी हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. आज बांदेरपोरा भागात एका घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर   लष्कराकडून शोधमोहीम सुरू  करण्यात आली. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत ललहारी याला ठार करण्यात आले."    या ठिकाणी अद्याप चकमक सुरू आहे. तसेच सुरक्षा दलांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना घेरले आहे. तसेच दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर 47 राष्ट्रीय रायफल्सच्या नेतृत्वाखाली लष्कर आणि राज्य पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने शोध मोहिम सुरू केली होती.   याआधी, दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा केला होता. या चकमकीत सैन्याचे दोन जवान शहीद झाले होते. शहीद झालेल्या जवानात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचा जवान सुमेध वामन गवई, तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांचा समावेश होता.शोपिया जिल्ह्यात अवनीरा गावात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, जम्मू - काश्मीर पोलीस, सैन्यदल आणि सीआपीएफने विशेष मोहीम हाती घेऊन तपास सुरू केला. याच वेळी चकमक उडाली. यात सैन्याचे पाच जवान जखमी झाले. जखमी झालेल्या पाच जवानांना सैन्याच्या ९२ बेस येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोन जवानांचा नंतर मृत्यू झाला. रात्रभर चकमक सुरू होती. त्यादरम्यान लष्कराने सकाळी तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते.