शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

तीन पिढ्या सैन्यात; आजोबा सुभेदार, वडील सैन्य प्रशिक्षक, आता मुलगा बनला अधिकारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 14:46 IST

Passing out Parade Result 2023: विशेष म्हणजे, गगनज्योत सिंगला IMA मध्ये त्याच्या वडिलांनीच ट्रेनिंग दिली.

Passing out Parade Result 2023: सैन्यात भरती होणे, अनेकांचे स्वप्न असते. दरवर्षी शेकडो उमेदवार सैन्यात भरती होतात. काहींच्या तर दोन किंवा तीन पिढ्याने सैन्यात सेवा दिली आहे. हरियाणातून असेच एक उदाहरण समोर आले आहे. हरियाणातील एका कुटुंबातून तिसरी पिढी सैन्यात भरती झाली आहे. 

हरियाणाच्या अंबालाचा रहिवासी असलेला गगनज्योत सिंग आयएमएमध्‍ये प्रशिक्षण घेतल्यानंतर अधिकारी झाला. विशेष म्हणजे, त्याला प्रशिक्षण देणारे, दुसरे-तिसरे कोणी नसून त्याचेच वडील सुभेदार मेजर गुरदेव सिंग होते. आपल्या मुलाच्या यशाबद्दल 51 वर्षीय गुरदेव सिंग म्हणाले की, माझा मुलगा आता लेफ्टनंट झाला, याचा मला अभिमान आहे. गगनज्योत सिंगला सैन्यात भरती होण्याची प्रेरणा वडील आणि आजोबांकडून मिळाली. गगनचे आजोबा अजित सिंगदेखील सुभेदार म्हणून निवृत्त झाले.

1947 च्या फाळणीवेळी भारतात आलेगगनज्योत सिंगची कथा लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्याचे आजोबा निवृत्त सुभेदार अजित सिंग 1947 मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आले. 1962, 1965 आणि 1971 च्या युद्धात ते देशासाठी लढले. अजितसिंगदेखील आपल्या नातवाचा पदवीदान समारंभ पाहण्यासाठी आयएमएमध्ये आले होते.

आपल्या नातवाच्या यशाबद्दल भावूक झालेले अजित सिंग म्हणाले की, त्यांचा नातू कुटुंबातील पहिला लष्करी अधिकारी असल्याचा मला अभिमान आहे. गगनज्योतचा धाकटा भाऊ जशन जोत सिंग (22) हा देखील सैन्यात शिपाई आहे आणि आर्मी कॅडेट कॉलेज ACC मध्ये अधिकारी होण्यासाठी तयारी करत आहे.

IMA मधून 373 कॅडेट्सची निवडइंडियन मिलिटरी अॅकॅडमी (IMA) येथे पार पडलेल्या पासिंग आऊट परेडनंतर भारतीय लष्कराला 331 तरुण अधिकाऱ्यांची तुकडी मिळाली आहे. सात मित्र देशांतील 42 कॅडेट्सही आयएमएकडून प्रशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण 373 कॅडेट्सची निवड करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPunjabपंजाबHaryanaहरयाणा