शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरोधात मोठा कट; सीमेपलीकडून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 14:00 IST

आज सकाळी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा आज सकाळी खात्मा करण्यात आला. यानंतर भारतीय लष्कराकडून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सीमेपलीकडे असलेल्या लॉन्चपॅड्सवरून २५० ते ३०० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.उत्तर काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये आज सकाळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे दोघेही नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. या भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर जवान अलर्ट झाले. त्यानंतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली.  भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे मनसुबे उधळून लावल्यानंतर मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी पत्रकार परिषद घेतली. सीमेपलीकडे असलेल्या लॉन्चपॅड्सवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते घुसखोरीसाठी पूर्ण तयारीत आहेत. तशी माहिती आम्हाला मिळालेली आहे, असं वत्स यांनी सांगितलं. 'सीमेपलीकडे असणारे लॉन्चपॅड्स पूर्णपणे सज्ज आहेत. साधारणत: २५० ते ३०० दहशतवादी तिथे सक्रिय आहेत,' अशी माहिती बारामुल्लामधील जीओसी १९ इन्फंट्री डिव्हिजनच्या विरेंद्र वत्स यांनी दिली.आज सकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईची माहितीदेखील लष्कराकडून देण्यात आली. 'नौगाम भागात नियंत्रण रेषेवर जवानांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पाकिस्तानी पोस्टच्या आसपास या हालचाली दिसल्या. त्यानंतर त्वरित कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला,' अशी माहिती वत्स यांनी दिली.ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे शस्त्रसाठा आणि रक्कम सापडल्याचं वत्स यांनी सांगितलं. दहशतवाद्यांकडे एके ऍसॉल्ट रायफल्स, १२ मॅगझिन्स, एक पिस्तुल आणि काही ग्रेनेड आढळून आले. याशिवाय त्यांच्याकडे भारतीय आणि पाकिस्तानी चलनातील दीड लाख रुपयांची रक्कम सापडली. या भागात अद्याप सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर