शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सायबर धमक्यांचा सामना करण्यास लष्कर सज्ज- बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 02:35 IST

सध्या चीनकडून अनेक देश आर्थिक मदत घेत आहेत. परंतु, त्या देशांना लवकरच कळेल की, काहीही फुकटात मिळत नसते. त्यासाठी कधी तरी किंमत मोजावीच लागते, असे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथे सांगितले.

पुणे : सध्या चीनकडून अनेक देश आर्थिक मदत घेत आहेत. परंतु, त्या देशांना लवकरच कळेल की, काहीही फुकटात मिळत नसते. त्यासाठी कधी तरी किंमत मोजावीच लागते, असे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथे सांगितले. तसेच भारताने सायबर धमक्यांना रोखण्यासाठी पुरेसे उपाय योजले आहेत. सायबर धमक्यांना सामोरे जाण्यासाठी आमच्याकडे योग्य यंत्रणा आहे. लष्कराला हळूहळू भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढवित आहे, असेही रावत यांनी सांगितले.‘बिम्सटेक’तर्फे औंध मिलिटरी स्टेशनवर पाच देशांचा संयुक्त युध्दसरावाचा समारोप रविवारी झाला. त्याप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नेपाळ आणि चीनदरम्यान जवळीकवाढत आहे. त्याबाबत ते म्हणाले, ‘‘आर्थिक प्रगतीची इच्छा असलेल्या कोणत्याही देशाला सहकार्याचे द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय मार्ग शोधणे आवश्यक असते. चीन आर्थिक सत्ता असल्याने ते इतरांना मदत करीत आहे. परंतु, ज्या देशांनी ही मदत घेतली आहे, त्यांना लवकरच समजेल की, काहीही फुकट मिळत नाही. हे हितसंबंध केवळ तात्पुरते असतात. सामाजिक, आर्थिक संबंध हे बदलत असतात. त्याचे चांगले उदाहरण म्हणजे यूएस-पाकिस्तानचे संबंध. त्यांचे पूर्वीसारखे आता संबंध राहिलेले नाहीत. त्यामुळे चीन आणि इतर देशांमध्ये वाढत असलेल्या जवळकीबाबत भारताला चिंता नाही.’’जनरल रावत म्हणाले, नेपाळ आणि भूतानसारख्या देशांना भौगोलिक परिस्थितीमुळे इतर देशांकडे दुर्लक्ष करावे लागेल. भारत शेजारच्या देशांबरोबर राजकीय संबंध विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहे. ‘नेबरहूड फर्स्ट अ‍ॅँड अ‍ॅक्ट ईस्ट’च्या धोरणानुसार भारत काम करीत आहे. त्याचा एक भाग म्हणजे बिम्सटेकचा युद्धसराव आहे.’’चीन उदयोन्मुख आर्थिक प्रतिस्पर्धीचीन भारताचा उदयोन्मुख आर्थिक प्रतिस्पर्धी आहे. दक्षिण पूर्व आशिया विभागात प्रभुत्व स्थापित करण्यासाठी दोन्ही देश एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे दहशतवादाचा धोका कमी होईल, असे रावत म्हणाले.नोकरी मिळाल्यास स्थलांतर थांबेलभारतात बेकायदेशीर स्थलांतराबाबत रावत म्हणाले, स्थलांतर ही एक जागतिक घटना आहे. हे कोणत्याही विशिष्ट देशासाठी मर्यादित नाही. हे प्रत्येक प्रांतांमध्ये होत आहे आणि लोकांना चांगले काम आणि चांगल्या जीवनासाठी स्थलांतरित व्हावे लागते. चांगली नोकरी मिळाली, तर कोणीही स्थलांतरीत होणार नाही.’’

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानchinaचीनPakistanपाकिस्तानcyber crimeसायबर क्राइम