शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

‘को-जीत’द्वारे लष्कर कोरोनावर मात करण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 07:07 IST

इंटिग्रेटेड स्टाफच्या उपप्रमुख लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : कोरोना साथीवर मात करणे हे एक प्रकारचे युद्धच असून ते आपल्याला जिंकायचे आहे. त्यासाठी सुरू होणाऱ्या मोहिमेला ‘को-जीत’ असे नाव देण्यात आले आहे, असे सैन्यदलांतील इंटिग्रेटेड स्टाफच्या उपप्रमुख (वैद्यकीय विभाग) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले.देशातील लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने राबविण्यासाठी तसेच विविध राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा तसेच वैद्यकीय मदत देण्यासाठी लष्कराने एक आराखडा तयार केला आहे, अशी माहितीही कानिटकर यांनी दिली. ऑक्सिजनचे रिकामे टँकर विविध राज्यांत लवकर पोहोचविण्यासाठी लष्कर मदत करणार आहे. त्यामुळे या टँकरचा वाहतुकीचा वेळ वाचेल.

राज्य सरकारशी चर्चा करून पावले उचलणारn कोरोना रुग्णांवरील उपचार व अन्य वैद्यकीय मदत करण्याकरिता प्रत्येक विभागातील मिलिटरी कमांडर किंवा वरिष्ठ लष्करी अधिकारी राज्य सरकारशी चर्चा करून त्याप्रमाणे पावले उचलतील. n माधुरी कानिटकर म्हणाल्या की, कोरोना साथीवर मात करण्यासाठी तीनही सैन्यदले आता कामाला लागली आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या लोकांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी लष्कर राज्य सरकारला मदत करणार आहे. n जिथे रुग्णशय्यांची संख्या अपुरी असेल तिथे ती वाढविण्याचाही प्रयत्न केला जाईल.

विविध लष्करी रुग्णालयांत कोरोनाबाधित नागरिकांवर उपचारांची सोय करण्यात आली आहे. लष्करी साधनसामग्री ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणारे रेल्वेचे डबे आता ऑक्सिजनची वाहतूक करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच लष्करातील वैद्यकीय कर्मचारीही कोरोनाग्रस्त नागरिकांवर उपचार करणार आहेत.        - माधुरी कानिटकर, लेफ्टनंट जनरल 

ऑक्सिजनसाठी लष्कराचे २०० ट्रक ड्रायव्हर सेवा बजावणारn ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी लष्करातील २०० ट्रक ड्रायव्हर जवान सेवा बजावणार आहेत. हवाई दलाच्या विमानांनी सिंगापूर, दुबई आदी देशांतून भारतात ऑक्सिजन टँकर आणले आहेत. n कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी लष्कराकडून सर्व साहाय्य करण्यात येईल, असे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच एका बैठकीत सांगितले होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndian Armyभारतीय जवान