शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 06:17 IST

२६ जुलै रोजी दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एसजी-३८६ या फ्लाइटच्या बोर्डिंगदरम्यान घडलेली ही घटना रविवारी उजेडात आली...

सुरेश एस डुग्गर -

श्रीनगर : श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या ग्राउंड स्टाफवर लष्करातील लेफ्टनंट कर्नलने थेट हल्ला चढवत चौघांना गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कर्मचाऱ्याची मणक्याची हाडे मोडली असून दुसऱ्याचा जबडा तुटला आहे. इतर दोन कर्मचाऱ्यांनाही मोठा मार लागला आहे. २६ जुलै रोजी दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एसजी-३८६ या फ्लाइटच्या बोर्डिंगदरम्यान घडलेली ही घटना रविवारी उजेडात आली.

लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंह असे या अधिकाऱ्याचे नाव असून गुलमर्ग येथील हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूलमध्ये ते सध्या तैनात आहेत. विमान सायंकाळी ६:१० वाजता श्रीनगरहून दिल्लीसाठी रवाना होणार होते. २४डी सिंह यांचा सीट क्रमांक होता. त्यांच्याकडे १६ किलोच्या दोन केबिन बॅग होत्या. ७ किलोपेक्षा जास्त वजन नेण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते. मात्र, सिंह यांनी शुल्क भरण्यास नकार दिला आणि बोर्डिंग पास न घेताच ते थेट एरोब्रिजमध्ये घुसले. सुरक्षा नियमांचे हे मोठे उल्लंघन असल्याने कर्मचाऱ्यांने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिंह यांनी कर्मचाऱ्यांना थेट मारहाण सुरू केली.

अशी केली ठोसाठोशी : सिंह यांच्या मारहाणीत एका कर्मचाऱ्याचा मणका फ्रॅक्चर झाला. दुसऱ्याचा जबडा तुटला. तिसऱ्याच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला तर चौथा कर्मचारी जागेवरच बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेतही त्याला सिंह यांनी लाथांनी बुकलले. त्याला मदत करायला आलेल्या कर्मचाऱ्यालाही जबर मार बसला.

‘नो-फ्लाय’ यादीत, लष्कराकडूनही चौकशीपोलिसांनी एफआयआर दाखल केला असला तरी अद्याप सिंह यांना वृत्त लिहिस्तोवर अटक झाली नव्हती. स्पाइसजेटने त्यांना ‘नो-फ्लाय’ यादीत टाकले असून नागरी उड्डयन मंत्रालयालाकडे तक्रार केली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. लष्करानेही या घटनेची दखल घेतली असून, सिंह यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSoldierसैनिकAirportविमानतळ