शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या जवानाला अटक; संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 13:03 IST

पाळत ठेवून जवानाला अटक; जयपूरमध्ये चौकशी सुरू

जसलमेर: राजस्थानच्या जसलमेरमधून एका भारतीय जवानाला अटक करण्यात आली आहे. भारतीय सैन्यासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप या जवानावर आहे. महिला एजंटच्या जाळ्यात अडकलेल्या जवानानं व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित जवानाला अटक करण्यात आली. या जवानाला आता चौकशीसाठी जयपूरला आणण्यात आलं आहे. राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्र यांनी या माहितीला दुजोरा दिला. सोमवीर नावाच्या जवानाला शुक्रवारी संध्याकाळी अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्याला जयपूरला आणण्यात आलं. सध्या त्याची पोलीस चौकशी सुरू आहे. सोमवीर सोशल मीडियाच्या माध्यमातून गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलीस आणि लष्कराला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचं एक विशेष पथक आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी त्याच्यावर नजर ठेवून होते. पाकिस्तानमधील एका महिलेनं जवानाला हनी ट्रॅप केल्याची माहिती लष्कर आणि पोलिसांनी मिळाली होती. सोमवीर या महिलेला सैन्याशी संबंधित गुप्त माहिती पुरवत होता. सोमवीर या महिलेला प्रशिक्षणादरम्यान भेटल्याची माहिती चौकशीतून समोर आली. जसलमेरमध्ये तैनात झाल्यावर सोमवीरनं संबंधित महिलेला संवेदनशील माहिती व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून दिल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच सोमवीरवर पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRajasthanराजस्थान