शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Bipin Rawat Helicopter Crash: सीडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, सोबत होते पत्नी सह 14 जण, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:46 IST

मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत आणि त्यांची पत्नीही होती.

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तसेच, हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. जखमींना वेलिंग्टन बेसमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे.

तामिळनाडूचे वनमंत्री के. रामचंद्रन यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार येथे (हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी) आलो आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. बचावकार्य सुरू आहे."

प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत आपल्या पत्नीसह वेलिंग्टनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. वेलिंग्टन येथे सशस्त्र दलांचे महाविद्यालय आहे. येथे सीडीएस रावत यांचे  लेक्चर होते. यानंतर, ते येथून कुन्नूरला परतत होते. कारण त्यांना येथून दिल्लीला रवाना व्हायचे होते. मात्र घनदाट जंगलात हा अपघात घडला. हा परिसर अत्यंत घनदाट असल्याचे सांगण्यात येते. येथे सर्वत्र केवळ झाडेच-झाडे आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा दिसून येत होत्या. पोलीस, लष्कराचे जवान तसेच हवाई दलाचे जवान बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच परिसरात शोधमोहीमही राबवली जात आहे.

हेलिकॉप्टरमध्ये होते बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि कर्मचारी  -ये हेलिकॉप्टर एमआय-सीरीजचे होते. अपघात झाला तेव्हा, हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि त्यांचा डिफेंस स्टाफ बसलेला होता. अपघातानंतर स्थानीय लोकही रेस्क्यू अभियानात मदतीसाठी धावले.

 

 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत