शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

मध्यप्रदेशात डॅमेज कंट्रोलसाठी संघ विस्तारकांची फौज; बंडखोरांंमुळे भाजपाचे वरिष्ठ नेते अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 06:03 IST

बंडखोरीमुळे ग्रासलेल्या मध्यप्रदेश भाजपाला डॅमेज कंट्रोलसाठी आता संघ विस्तारकांची मदत घ्यावी लागत आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार १०० हून अधिक संघ विस्तारकांनी मध्यप्रदेशात तळ ठोकला आहे.

- गजानन चोपडे

जबलपूर : बंडखोरीमुळे ग्रासलेल्या मध्यप्रदेश भाजपाला डॅमेज कंट्रोलसाठी आता संघ विस्तारकांची मदत घ्यावी लागत आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार १०० हून अधिक संघ विस्तारकांनी मध्यप्रदेशात तळ ठोकला आहे. पूर्व योजना आणि पूर्ण योजना, या धर्तीवर काम करण्यासाठी प्रशिक्षित विस्तारकच यशस्वी होऊ शकतात, ही बाब भाजपने हेरली असून त्या दिशेने रणनीती आखली आहे.बंडोबांना थारा द्यायचा नाही, अशी भूमिका घेत पक्षश्रेष्ठींनी भाजपाच्या ५३ स्थानिक नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पण मतदानाला काही दिवस शिल्लक असताना भाजपा नेते या बंडखोरांच्या कारवायांमुळे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे बूथनिहाय योजना आखणे ङ्क्तव त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चार राज्यातील १०० हून अधिक संघ विस्तारक राज्यात दाखल झाले आहेत. या विस्तारकांचा क्लास घेण्यात आला. आगामी लोकसभानिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेची निवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. नाराजांची मनधरणी, रोज बुथनिहाय बैठका, दिवसभरातील कामांचा आढावा, मतदान केंद्रांवर साहित्य पोहचले वा नाही याचा पाठपुरावा, मतदारयादीसाठी नेमलेल्या पानप्रमुखाशी समन्वय साधणे आदी कामे संघ विस्तारकांवर सोपविली आहेत.शेतकऱ्यांसाठी घोषणाशेतमालाच्या रास्त भावासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान जून २०१७ मध्ये मंदसौरमध्ये झालेल्या गोळीबारात सहा शेतकºयांना जीव गमवावा लागला होता. शेतकरी वर्गामधील नाराजी कमी व्हावी यासाठी भाजपाने जाहीरनाम्यातील ५८५ घोषणांपैकी १०२ घोषणा शेतकºयांच्या हिताच्या केल्या आहेत. हा मुद्दा राज्यातील १०० जागांवर प्रभाव टाकू शकतो, असे भाजपा नेत्यांना वाटते. याशिवाय अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये झालेल्या दुरुस्तीमुळे नाराज समाजाला आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ