शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आर्मी दिन ! भारतीय सैन्याचा इतिहास अन् जाणून घ्या लष्कराबद्दल खास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 10:16 AM

भारतीय सैन्यांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. सैन्याप्रती मनात आदरभाव ठेवत देशभर हा दिवस साजरा केला जातो.

मुंबई - देशात 15 जानेवारी आर्मी दिन म्हणजेच सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. फील्ड मार्शल के.एम.करियप्पा यांनी याच दिवशी 15 जानेवारी 1949 रोजी शेवटचा ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल सर फ्रांसिस बूचर यांच्याकडून भारतीय थल सैन्याच्या कमांडर इन चीफचा पदभार स्वीकारला होता. त्यानिमित्त नवी दिल्ली आणि सैन्याच्या सर्वच प्रमुख कार्यालयात परेड्स आणि सैन्याच्या कसरती केल्या जातात. 

भारतीय सैन्यांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. सैन्याप्रती मनात आदरभाव ठेवत देशभर हा दिवस साजरा केला जातो. सैन्य दिनानिमित्त आपण भारतीय लष्काराच्या काही खास बाबी जाणून घेऊया. 

भारतीय सैन्याची स्थापना - कोलकाता येथे 1776 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सरकारच्या अधीन राहून भारतीय सैन्याची स्थापना केली. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत. भारतीय सैन्यात सैनिक आपल्या इच्छेने सहभागी होतात. 

सर्वात उंच युद्धभूमी भारतातील सियाचीन ग्लेशियल हे जगातील सर्वात उंच रणमैदान आहे. समुद्रसपाटीपासून हे मैदान तब्बल 5 हजार मीटर उंचीवर आहे. 

आसाम रायफल आसाम रायफल ही देशातील सर्वात जुनी पॅराममिलिट्री फोर्स आहे. याची स्थापना 1835 साली झाली होती. 

सर्वाधिक संख्येनं युद्धी बंदी बनवलेभारत-पाकिस्तान यांच्यातील 1971 सालच्या युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याच्या जवळपास 93 हजार सैनिक आणि अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर ताब्यात घेतलेल्या युद्ध बंदकांची ही संख्या सर्वाधिक आहे. 

जगातील सर्वात उंच पूलबेल पुल हा जगातील सर्वात उंच पूल आहे. हिमाचल प्रदेशमधील द्रास आणि सुरू नदीच्या मध्यभागी लद्दाखच्या पर्वतरांगामध्ये हा पूल आहे. सन 1982 मध्ये भारतीय सैन्याने हा पूल बांधला आहे. 

तजाकिस्तानतजाकिस्तान येथे भारतीय वायू सेनेचा एक आऊट स्टेशन तळ आहे. तर दुसरा बेस अफगानिस्तान येथे बनविण्याचा विचार भारतीय वायू सेन करत आहे. 

घोडेस्वार रेजिमेंटभारतीय सैन्याकडे एक घोडेस्वार रेजिमेंट आहे. जगभरात अशा प्रकारच्या केवळ तीनच रेजिमेंट शिल्लक राहिल्या आहेत. ज्यामध्ये एक भारतीय आहे. 

नौसेना अकॅडमीभारतीय नौसेना अकॅडमी, केरळमधील एझिमाला येथे आहे. आशियातील ही भारतीय प्रकारातील सर्वात मोठी नौसेना अकॅडमी आहे. 

गुप्तचर विभागडायरेक्टोरेट ऑफ मिलिट्री इंटेलिजन्स नावाने भारतीय सैन्याची गुप्तचर यंत्रणा काम करते. सन 1941 साली याची स्थापना झाली आहे. सैन्य दलातील भ्रष्टाचार आणि सीमा रेषेवर गुप्त माहिती मिळविण्यासाठी हा विभाग काम करते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndian Army Dayभारतीय सैन्य दिन