शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

सर्जिकल स्ट्राईकचा भाग असलेला मेजर जनरल लैंगिक छळ प्रकरणी दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 11:34 IST

भारतीय सैन्यदलातील एका मेजर जनरलला महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आर्मी जनरल कोर्ट मार्शलने याप्रकरणी मेजर जनरलला लष्करातून बडतर्फ करा अशी शिफारस केली आहे.

ठळक मुद्देभारतीय सैन्यदलातील एका मेजर जनरलला महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.आर्मी जनरल कोर्ट मार्शलने याप्रकरणी मेजर जनरलला लष्करातून बडतर्फ करा अशी शिफारस केली आहे. कॅप्टन पदाच्या महिला अधिकाऱ्याने लैंगिक शोषणाबाबत केलेले सर्व आरोप मेजर जनरलनी फेटाळले आहेत.

नवी दिल्ली - भारतीय सैन्यदलातील एका मेजर जनरलला महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आर्मी जनरल कोर्ट मार्शलने याप्रकरणी मेजर जनरलला लष्करातून बडतर्फ करा अशी शिफारस केली आहे. दोन वर्षापूर्वी म्हणजे 2016 मध्ये मेजर जनरल देशाच्या नैऋत्य भागात कार्यरत असताना ही लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. महिला अधिकाऱ्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 या मेजर जनरलने सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे त्याला पदोन्नती मिळाली होती. कॅप्टन पदावरील महिला अधिकाऱ्याने लैंगिक शोषणाबाबत केलेले सर्व आरोप मेजर जनरलनी फेटाळले आहेत. 2016मध्ये लष्करप्रमुखांची नियुक्ती झाली. यावरून निर्माण झालेल्या गटबाजीचा मी बळी आहे, असा दावा मेजर जनरलने केला आहे. 

मेजर जनरलला प्रकरणी कलम 354अ अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे. मेजर जनरल दोषी आढळल्यामुळे त्यांना लष्करातून बडतर्फ करण्याची शिफारस आर्मी जनरल कोर्ट मार्शलने केली आहे. या निकालाला आव्हान देण्यात येणार असल्याचे मेजर जनरलची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले. मेजर जनरलची बाजू समजून घेतली नाही. पुराव्याची चिकित्सा व्यवस्थितपणे झालेली नाही, निकाल घाईघाईने दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आता हा निकाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवान