शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

३० देशांचे सैन्यदल प्रमुख दिल्लीत; संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 06:28 IST

संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले, आव्हानांना एकट्याने तोंड देणे सध्या अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राच्या गुंतागुंतींना सामोरे जाण्यासाठी आणि या प्रदेशात समृद्धी, सुरक्षा आणि सर्वसमावेशक भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी केले.

१३ व्या हिंद प्रशांत महासागर क्षेत्र सैन्यदल प्रमुखांच्या संमेलनात(आयपीएसीसी) सिंह म्हणाले की, राष्ट्रांनी हे समजून घेतले पाहिजे की जागतिक समस्यांमध्ये अनेक देशांचा संबंध येतो आणि कोणताही देश या आव्हानांना एकट्याने तोंड देऊ शकत नाही. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात चीनच्या आक्रमक लष्करी वर्तनावर वाढत्या जागतिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांची टिप्पणी आली आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम’ या प्राचीन भारतीय मूल्यांच्या अनुषंगाने हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता आणि समृद्धी साधली जाऊ शकते. भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या या परिषदेत ३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

शांततापूर्ण विवाद सोडवणुकीवर भरभारताचा दृष्टिकोन सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्यावर भर देतो, विवादांचे शांततापूर्ण निराकरण, बळाचा वापर टाळणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन यावरही आमचा भर आहे. शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी या प्रदेशातील सर्व पक्षांशी रचनात्मकच चर्चेची भारताची वचनबद्धता अटल आणि स्थिर आहे.    - जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख  

आम्ही अजूनही शत्रुत्वाला तोंड देत आहोतमुक्त हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रासाठी सर्व राष्ट्रांकडून प्रयत्न केले जात असतानाही, आम्ही आंतरराज्य वाद आणि शत्रुत्वाला तोंड देत आहोत. आम्ही सीमेपलीकडून आव्हानांना तोंड देत आहोत आणि त्यांना आमच्या प्रत्युत्तरात ही बाब लक्षात ठेवली पाहिजे,” असेही लष्करप्रमुख म्हणाले.

लष्करी संबंधांवर परिणाम नाही : कॅनडाभारत आणि कॅनडा दरम्यान सुरू असलेल्या राजनैतिक वादाचा त्यांच्या द्विपक्षीय लष्करी संबंधांवर परिणाम होणार नाही आणि हे प्रकरण राजनैतिक पातळीवर सोडवावे लागेल, असे कॅनडाचे उपलष्कर प्रमुख मेजर जनरल पीटर स्कॉट यांनी मंगळवारी म्हटले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहdelhiदिल्लीIndian Armyभारतीय जवान