शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 18:40 IST

Manoj Pande Extension : मनोज पांडे हे देशातील पहिले इंजिनियर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखांची कमान सोपवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना सेवेत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. जनरल मनोज पांडे ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. मात्र. आता त्यांचा कार्यकाळ संरक्षण मंत्रालयाने एक महिन्याने वाढवला आहे.

रविवारी (२६ मे) मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या सेवेत एक महिन्याची मुदतवाढ मंजूर केली आहे. मनोज पांडे हे ३१ मे २०२४ रोजी निवृत्त होणार होते, परंतु आता मनोज पांडे हे ३० जून २०२४ पर्यंत सेवा करतील, असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, मनोज पांडे यांची ३० एप्रिल २०२२ रोजी नियुक्ती झाल्यापासून ते लष्करप्रमुख पदावर कार्यरत आहेत.

संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २६ मे २०२४ रोजी लष्करी नियम १९५४ च्या नियम १६ अ (४) अंतर्गत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या सेवेत त्यांच्या सामान्य सेवानिवृत्तीच्या वयापासून (३१ मे २०२४) म्हणजे ३० जून २०२४ पर्यंत एक महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.

मूळचे नागपूर येथील असलेले मनोज पांडे यांना भारतीय लष्कराचा प्रदीर्घ अनुभव आहे. जनरल मनोज पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीत इंजिनिअर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माऊंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती. मनोज पांडे हे देशातील पहिले इंजिनियर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखांची कमान सोपवण्यात आली आहे.

'एनडीए' ते लष्करप्रमुखमनोज पांडे यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर स्थित वायुसेना नगरातील केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावी नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी डेहराडूनमधील मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२ मध्ये ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्स (बॉम्बे सॅपर्स) या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. कॅम्बर्ली (ब्रिटन) स्टाफ कॉलेज, महूचे आर्मी वॉर कॉलेज, दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी 'हायर कमांड कोर्स' केला आहे. आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये देखील सक्रियरीत्या सहभागी झाले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान