जेएनयूमध्ये आढळली शस्त्रास्त्रांनी भरलेली बॅग

By Admin | Updated: November 7, 2016 10:55 IST2016-11-07T10:41:49+5:302016-11-07T10:55:57+5:30

राजधानी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली एक बेवारस बॅग आढळून आली आहे.

Arms bag found in JNU | जेएनयूमध्ये आढळली शस्त्रास्त्रांनी भरलेली बॅग

जेएनयूमध्ये आढळली शस्त्रास्त्रांनी भरलेली बॅग

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 7 - राजधानी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये (जेएनयू)एक बेवारस बॅग आढळून आली आहे. ही बेवारस बॅग शस्त्रास्त्रांनी भरलेली होती. दोन पिस्तुल, सात काडतुसे आणि एक स्क्र्यू ड्रायव्हर या बॅगमध्ये सापडले आहेत.
 
जेएनयू कॅम्पसच्या उत्तरेकडील गेटच्या परिसरात ही बेवारस बॅग आढळून आली आहे. दरम्यान ही बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
 
रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास ही बेवारस बॅग आढळून आली. यानंतर त्यांनी तातडीने युनिव्हर्सिटी प्रशासनाला याची माहिती दिली.
 
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी अज्ञातांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 
 
 
 
 

Web Title: Arms bag found in JNU