शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 21:37 IST

भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अर्जन सिंह (९८) यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

नवी दिल्ली, दि. 16 - भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती नाजूक असल्याने हवाई दलाचे प्रमुख बी.एस.धनवा, केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. हवाईदलाने अर्जन सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. अखेर आज त्यांचं निधन झालं.

पाच स्टार मिळवणारे अर्जन सिंह एकमेव अधिकारी होते. वयाच्या 45 व्या वर्षी सर्वात तरुण हवाईदल प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला होता. हवाईदलात सेवा बजावताना 60 वेगवेगळ्या प्रकारची विमाने त्यांनी उडवली. 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 1969 रोजी अर्जन सिंह सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त होत असतानाही अर्जन सिंह यांचा उत्साह एखाद्या तरुण अधिका-याला लाजवेल असाच होता. अर्जन सिंह चिफ ऑफ एअर स्टाफ असतानाच हवाईदलाच्या ताफ्यात सुपरसॉनिक फायटर्स, टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि अॅसॉल्ट हेलिकॉप्टर्स दाखल झाली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलं आहे. 'अर्जन सिंह यांचं योगदान कायम स्मरणात राहिल. अर्जन सिंह यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्राची ताकद वाढवली', अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 

2016 रोजी अर्जन सिंह यांच्या 97 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाईदल तळाला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. हवाई दलाचे पानागड विमानतळ आता अर्जनसिंग यांच्या नावाने ओळखले जाते. जिवंतपणी एका विमानतळाला नाव देण्यात आलेले ते एकमेव अधिकारी ठरले.