शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये वादावादी, नेमकं घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:27 IST

Trinamool Congress News: मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा दावा केला होता.

मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये वादावादी झाल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी आणि खासदार कीर्ती आझाद यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांकडून या वादाबाबत आणखी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार या संपूर्ण वादाची सुरुवात तृणमूल काँग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदारामुळे झाली होती.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार खासदार कीर्ती आझाद यांना संसदेत संदेश नावाचं एक मिठाईचं दुकान सुरू करायचं होतं. त्यासाठी ते अर्ज करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कल्याण बॅनर्जी यांनी त्यांना रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेमध्ये संदेश मिठाई नावाचं एक दुकान सुरू करण्यासाठी काही महिला खासदारांच्या स्वाक्षरीसह कीर्ती आझाद यांनी एक पत्र तयार केल्याची माहिती कल्याण बॅनर्जी यांना मिळाली. ही माहिती मिळताच कल्याण बॅनर्जी यांनी याला विरोध केला.

त्यानंतर ४ एप्रिल रोजी कल्याण बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सात ते आठ खासदारांच्या सहीसह एक मेमोरेंडम देण्याची योजना आखली. मात्र एका महिला खासदाराला जेव्हा यावर आपली स्वाक्षरी नसल्याचे समजले. तेव्हा त्यावरून वादालासुरुवात झाली. तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार कल्याण बॅनर्जी हे या महिला खासदारावर खूप नाराज आहेत. तर सदर महिला खासदारही कल्याण बॅनर्जी यांच्यावर  नाराज आहे. तसेच त्यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून याबाबतची तक्रार केली आहे.

दरम्यान, भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केलेल्या दाव्यानुसार पत्रक घेऊन जाणारा खासदार संसदेच्या बैठकीत सहभागी झाला नव्हता. तर तो थेट निवडणूक आयोगाकडे गेला. त्यामुळे दुसरा एक खासदार नाराज झाला. त्यामधून निवडणूक आयोगामध्येच दोघेही आमने-सामने आले. त्यानंतर त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. तसेच हे दोन्ही नेते एकमेकांवर ओरडू लागले. प्रकरण एवढं वाढलं की, एका खासदाराने तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मध्ये हस्तक्षेप करायला सांगितले. वाद खूपच वाढला, अखेरीस हे प्रकरण ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचले. तसेच ममता बॅनर्जी यांनी दोन्ही खासदारांना शांत राहण्यास सांगितले, असा दावाही अमित मालवीय यांनी केला.  

टॅग्स :All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसParliamentसंसद