शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही डार्विनचा सिद्धांत सिद्ध करायला बसलोय का? सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 14:20 IST

याचिकाकर्ते राजकुमार सुनावणीसाठी कोर्टात भगवे कपडे परिधान करून आले होते. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. 

नवी दिल्ली : प्रख्यात संशोधक चार्ल्स डार्विन यांची ‘थिअरी ऑफ इव्होल्युशन’ आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांची ‘थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ चुकीची आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही इथे बसलेलो नाही. तसे काही असेल तर तुम्ही स्वत:ची थिअरी तयार करा, अशा शब्दात शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने एका याचिकाकर्त्याचे कान टोचले. 

याचिकाकर्ते राजकुमार सुनावणीसाठी कोर्टात भगवे कपडे परिधान करून आले होते. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. 

तुम्हाल वाटतेय तर तुम्ही सिद्ध करा- सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या पीठाने स्पष्ट केले की, एखाद्या वैज्ञानिक सिद्धांताला खोडून काढण्यासाठी घटनेच्या ३२ व्या कलमानुसार कोणत्याही प्रकारची रिट याचिका करता येत नाही. - कोर्टाने स्पष्ट केले की, डार्विन आणि आइनस्टाइन यांनी मांडलेले वैज्ञानिक सिद्धांत कसे चुकीचे आहेत, हे याचिकाकर्त्याला दाखवून देण्यासाठी व्यासपीठ हवे आहे. असे वाटत असेल तर याचा जरूर प्रचार करू शकता.

याचिकेत मागणी काय? याचिकाकर्त्यांनी कोर्टात युक्तिवाद केला की, शाळा आणि कॉलेज जीवनात आपण चार्ल्स डार्विन यांनी मांडलेली ‘थिअरी ऑफ इव्होल्युशन’ आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या ‘थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’चा अभ्यास केला. असे लक्षात आले की हे सिद्धांत चुकीचे आहेत. हे शिकवल्याने आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आली. 

अधिकारांचा भंग नाही : कोर्टयावर कोर्ट म्हणाले की, तुम्ही म्हणत आहात की याचा अभ्यास तुम्ही शाळा आणि कॉलेजात केला. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी होता. आता सांगत आहात की हे सिद्धांत चुकीचे आहेत. तुम्ही काय मानता याच्याशी आमचे घेणे-देणे नाही. यामुळे घटनेच्या ३२ व्या कलमानुसार आपल्याला मिळालेल्या कोणत्याही मूलभूत अधिकारांचे हनन होत नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय