शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पांडवांचं लाक्षागृह शोधणार पुरातत्त्व विभाग, पुढच्या महिन्यात होणार खोदकामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 20:48 IST

नवी दिल्ली- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग महाभारतातील प्रसिद्ध लाक्षागृहाचा शोध लावणार आहे.

नवी दिल्ली- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग महाभारतातील प्रसिद्ध लाक्षागृहाचा शोध लावणार आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील बरनावा भागात लाक्षागृहाचा शोध घेण्यासाठी एएसआयकडून खोदकामही करण्यात येणार आहे. स्थानिक इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववाद्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या या मागणीला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागानं मंजुरी दिली आहे.महाभारतात पांडवांना जिवानिशी मारण्यासाठी कौरवांनी लाखेपासून हा महाल बनवला होता. ज्यात पांडवांना जिवंत जाळण्याची योजना होती. परंतु पांडवांना विदुरच्या माध्यमातून याची सूचना मिळाली आणि ते महालातील गुप्त मार्गानं बाहेर निघाले. या लाखेच्या महालाला लाक्षागृह म्हटलं जातं.टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एएसआयचे निर्देशक जितेंद्र नाथ म्हणाले की, प्रस्तावाचा सखोल अभ्यास केल्यानंतर आम्ही एएसआयच्या दोन प्राधिकरणांना शोधकामासाठी परवाना दिला आहे. एएसआयच्या उत्खनन शाखा आणि दिल्लीतील लाल किल्लेस्थित पुरातत्त्व विज्ञान संस्थांचाही यात सहभाग आहे. पुढच्या महिन्यात खोदकामाला सुरुवात होणार आहे. दोन्ही संस्था संयुक्तरीत्या खोदकाम करून लाक्षागृहाचा थांगपत्ता लावणार आहेत.पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला खोदकाम सुरू होईल आणि ते तीन महिने सुरू राहील. पुरातत्त्व विज्ञान संस्थेचे विद्यार्थीही यात सहभागी होतील. एएसआयला या खोदकामातून काही तरी हाती लागेल, अशी आशा आहे. या आधीही आजूबाजूच्या खोदकामात महत्त्वपूर्ण वस्तू सापडल्या आहेत. उत्खननामध्ये हडप्पा संस्कृतीच्या वेळीच्या वस्तूही सापडल्या होत्या. चंदायन आणि सनोलीजवळ हे खोदकाम करण्यात आलं होतं. सनोलीमध्ये उत्खननादरम्यान हडप्पा संस्कृतीच्या काळातील काही महत्त्वपूर्ण वस्तूही सापडल्या आहेत. 2005मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापळे आणि भांडी सापडली होती. तसेच 2014मध्ये चंदायन गावात एक तांब्याचं एक मुकूटही सापडला असून, तो रत्नजडित होता. पांडव लक्षागृहातील त्या गुप्त बोगद्यातून बाहेर पडले, तो शोधण्यात एएसआयला रुची आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीhistoryइतिहास