शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

औषध कंपन्या व डॉक्टर यांच्या अभद्र युतीला चाप; भेटवस्तू, विदेश वा-यांवर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:20 IST

नवी दिल्ली : डॉक्टर ठराविक कंपन्यांची ठराविक औषधे लिहून देतात व ती औषधे फक्त त्या दवाखान्याशेजारच्या मेडिकल स्टोअरमध्येच मिळतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. यासाठी औषध कंपन्या किंमती भेटवस्तू देऊन आणि सहकुटुंब परदेशी सहली आयोजित करून डॉक्टरांना खुश ठेवतात, हेही उघड गुपित आहे. मात्र असे अनैतिक मार्केटिंग करणाºया औषध कंपन्यांवर बडगा ...

नवी दिल्ली : डॉक्टर ठराविक कंपन्यांची ठराविक औषधे लिहून देतात व ती औषधे फक्त त्या दवाखान्याशेजारच्या मेडिकल स्टोअरमध्येच मिळतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. यासाठी औषध कंपन्या किंमती भेटवस्तू देऊन आणि सहकुटुंब परदेशी सहली आयोजित करून डॉक्टरांना खुश ठेवतात, हेही उघड गुपित आहे. मात्र असे अनैतिक मार्केटिंग करणाºया औषध कंपन्यांवर बडगा उगारून या अभद्र युतीला चाप लावण्याची केंद्र सरकार तयारी करीत आहे.जगातील अनेक देशांत औषध कंपन्या व डॉक्टर यांच्या या संगनमती गैरव्यवहारांविरुद्ध कठोर नियमावली असून त्याची चोख अंमलबजावणीही केली जाते. भारतात मात्र कोणतीही सरकारी बंधने नसल्याने औषध उद्योग आपल्यापुरते स्वयंशिस्तीचे नियम करून त्याचे पालन केल्याचा बहाणा करीत असतो. याला आळा घालण्यासाठी केंद्रीय औषधनिर्मिती विभागाने एका नियमावलीचा मसुदा तयार केला असून कायदा विभाग सध्या त्याची छाननी करीत आहे, असे माहितगार सूत्रांनी सांगितले. मात्र ही नियमावली लागू करण्यासाठी सध्या तरी कोणतीही वेळ ठरलेली नाही, असे हा अधिकारी म्हणाला.सूत्रांनुसार या प्रस्तावित नियमावलीनुसार औषध कंपन्यांनी डॉक्टरांसाठी सहली आयोजित करण्यावर पूर्ण मज्जाव केला जाईल व भेटवस्तूंसाठीही वर्षाला १० हजार रुपयांची कमाल मर्यादा घातली जाईल. नव्या औषधांची ‘फ्री सॅम्पल’ देण्यवरही मर्यादा आणली जाईल.औषधांची गुणकारकता आणि रोगनिवारणशक्ती याविषयी फसव्या आणि अतिरंजित दावे करणाºया जाहिराती करण्यासही प्रतंबंध करणे प्रस्तावित आहे.मुख्य म्हणजे नियमांचे पालन न केल्यास प्रस्तावित केलेली दंडात्मक कारवाई हा यातील महत्वाचा भाग असून अशा कठोर कारवाईनेच चुकार कंपन्या वठणीवर येऊ शकतील, अशी आशा या सूत्रांनी व्यक्त केली.उल्लंघनाच्या गांभीर्यानुसार निरनिराळी दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे समजते. त्यात संबंधित कंपनीच्या सर्वाधिक खपणाºया ब्रँडची सर्व औषधे जप्त करून ती सरकारी इस्पितळांना वितरित करण्यापासून ते कंपनीस एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही औषधे विकण्यास पूर्ण बंदी करण्यापर्यंतच्या कारवाईचा समावेश असेल.सूत्रांनुसार कंपनी दंड भरण्यास तयार असेल तर विक्रीबंदीचा आदेश मागे घेतला जाऊ शकेल. हा प्रस्तावित दंड किमान पाच लाख रुपयांपासून कमाल एक कोटी रुपयांपर्यंत असू शकेल.इतर काही नियम असे-औषध कंपन्या सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांसाठी जनजागृती कॅम्प घेऊ शकतील. पण तेथेही डॉक्टरांना त्यांच्या सराकीर दैनिक उत्पन्नाएवढाच मेहताना देता येईल.अशा कॅम्पमध्ये कंपनीला स्वत:च्या औषधांची खुली अथवा छुपी जाहिरात करता येणार नाही. डॉक्टरांच्या माध्यमातून औषधांची विक्री वाढविण्यासाठी नेमलेला ‘एमआर’चा ताफा कंपन्यांना कमी करावा लागेल व त्यांना विक्रीवर आधारित प्रोत्साहन भत्ते देता येणार नाहीत. अंमलबजावणीसाठी केंद्रात सहसचिव दर्जाचा खास अधिकारी नेमणार.