शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश नियुक्तीत केंद्र सरकारची मनमानी; सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 06:52 IST

शिफारशींवरून सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कॉलेजियमने उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बदलीसाठी केलेल्या शिफारशींपैकी निवडक शिफारशींना मान्यता देण्याची केंद्राची पद्धत मनमानी असून, यामुळे चांगला संदेश जात नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले  आहे.

कॉलेजियमने बदलीसाठी शिफारस केलेल्या ११ न्यायाधीशांपैकी पाच न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. परंतु सहा न्यायाधीशांच्या शिफारशी अद्याप प्रलंबित आहेत. यात गुजरात उच्च न्यायालयातील चार तसेच अलाहाबाद आणि दिल्ली उच्च न्यायालयातील प्रत्येकी एका नावाच्या शिफारशीचा समावेश आहे. खंडपीठात दोन याचिकांवर सुनावणी सुरू होती. यापैकी एका याचिकेत कॉलेजियमने नियुक्ती व बदलीसाठी शिफारस केलेल्या नावांना मंजुरी देण्यास केंद्राकडून विलंब झाल्याचा आरोप होता.नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या नावांपैकी आठ नावांना मंजुरी मिळालेली नाही, असे न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने म्हटले. 

सहाऐवजी पाच बदल्यांचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे सदस्य न्यायमूर्ती कौल ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरामानी यांना म्हणाले, माझ्या माहितीनुसार तुम्ही पाच न्यायाधीशांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. तुम्ही सहा न्यायाधीशांच्या बदलीचे आदेश अद्याप जारी केलेले नाहीत. यापैकी चार गुजरातमधील आहेत. हे मान्य नाही. मागील वेळीही मी निवडक बदल्या करू नयेत, यावर भर दिला होता, असेही न्यायमूर्ती कौल म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्ली