शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत करण्यास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 04:53 IST

अटक व अटकपूर्व जामीन या संबंधिच्या तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करून हा कायदा पूर्ववत करणारे सुधारणा विधेयक लोकसभेने मंगळवारी मंजूर केले.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) गुन्हा नोंदणी, अटक व अटकपूर्व जामीन या संबंधिच्या तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करून हा कायदा पूर्ववत करणारे सुधारणा विधेयक लोकसभेने मंगळवारी मंजूर केले.डॉ. सुभाष काशिनाथ महाजन वि. महाराष्ट्र सरकार या प्र्रकरणात न्यायालयाने २० मार्च रोजी हा निकाल दिल्यानंतर दलित समाजात देशभर संतापाची लाट उसळली होती. सरकारने वटहुकूम काढून हा निकाल निष्प्रभ करावा या मागणीसाठी दलित संघटनांनी गुरुवारी ९ आॅगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी हे सुधारणा विधेयक तातडीने मांडले.अ‍ॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल झाल्यावर आरोपीवर गुन्हा नोंदविण्यापूर्वी तक्रारीतील तथ्यांच्या खरेपणाची शहानिशा करावी व उपअधीक्षक दर्जाच्या वरिष्ठाची संमती घेतल्यानंतरच अटक करावी, अशी बंधने सर्वोच्च न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यावर घातली होती. तसेच अशा प्रकरणांतील आरोपींना अटकपूर्व जामीन मागण्याची सोयही उपलब्ध करून दिली होती.न्यायालयाचा हा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या सुधारणा विधेयकाने मूळ अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात १८ ए हे नवे कलम समाविष्ट केले जाईल. त्यात म्हटले आहे की, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यापूर्वी तक्रारीची प्राथमिक शहानिशा करण्याची गरज असणार नाही तसेच आरोपीला अटक करण्यासाठी तपासी अधिकाºयाने वरिष्ठाची संमती घेण्याचीही जरुरी नाही. कोणत्याही न्यायालयाने काहीही निकाल दिला असला तरी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ अन्वये असलेली अटकपूर्व जामिनाची तरतूद अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात लागू होणार नाही.विधेयकाच्या उद्देशपत्रिकेत स्पष्ट करण्यात आले की, एखादा गुन्हा घडल्याची माहिती मिळाल्यावर तपासी अधिकाºयाने गुन्हा नोंदविण्यापूर्वी शहानिशा करण्याची किंवा अटक करण्याआधी वरिष्ठाची संमती घेण्याची दंड प्रक्रिया संहितेत कुठेही तरतूद नाही.न्यायालयाच्या निकालाने कायद्यात नसलेली ही तरतूद लागू केली गेल्याने ही सुधारणा करून तपासी अधिकाºयास त्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे पुन्हा बहाल करणे गरजेचे आहे. शिवाय न्यायालयाने ठरवून दिलेल्या पद्धतीने आरोपपत्र दाखल होण्यास विलंब लागेल, असेही कारण देण्यात आले.>लगेच लागू होणार नाहीआता हे सुधारणा विधेयक राज्यसभेनेही मंजूर करावे लागेल. त्यानंतर राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावर केंद्र सरकार अधिसूचित करेल त्या तारखेपासून अ‍ॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत होईल.तोपर्यंत दाखल होणाºया अ‍ॅट्रॉसिटीच्या फिर्यादींवर न्यायालयाने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच कारवाई करावी लागेल.

टॅग्स :Loksabhaलोकसभा