शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून तू-तू, मैं-मैं, कॉलेजियमकडून खूप कमी नावांची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:46 IST

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून न्यायसंस्था आणि कार्यकारी मंडळादरम्यान चालू असलेल्या संघर्षाचा प्रत्यय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आला.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून न्यायसंस्था आणि कार्यकारी मंडळादरम्यान चालू असलेल्या संघर्षाचा प्रत्यय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आला. न्यायाधीशांच्या रिक्त पदांसाठी खूपच कमी नावांची शिफारस केल्याबद्दल केंद्र सरकारने कॉलेजियमवर प्रश्न उपस्थित केला, तर दुसरीकडे कॉलेजियमची शिफारस रखडत ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही केंद्रावर टीका केली.कॉलेजियमने शिफारस केलेल्या नावांपैकी किती नावे तुमच्याकडे प्रलंबित आहेत, अशी विचारणा न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या न्यायपीठाने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना केली. यासंदर्भात माहिती घ्यावी लागेल, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. त्यावर न्यायपीठ म्हणाले की, सरकारवर येते तेव्हा तुम्ही म्हणता की, माहिती घेऊन सांगतो.मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या रिक्त पदांबाबत सुनावणी होत आहे; परंतु ज्या उच्च न्यायालयात न्यायाधीशांची ४० पदे रिक्त आहेत, त्यासंदर्भात कॉलेजियमने फक्त तिघांच्याच नावांची शिफारसकेली आहे. अधिक नावांचीशिफारस करायला हवी. काही न्यायालयात ४० पदे रिक्त असताना कॉलेजियमने फक्त तीननावांची शिफारस केली आहे. उलट सरकारच रिक्त पदे भरण्यासाठी उत्सुक नसल्याचे बोललेजाते. कॉलेजियमकडून शिफारस नसेल, तर काहीच करता येऊशकत नाही. त्यावर न्यायपीठानेस्मरण करून दिले की,सरकारलाच नियुक्त्या करायच्या असतात.रिक्त जागांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करान्या. एम. याकूब मीर आणि न्या. रामलिंगम सुधाकर यांची अनुक्रमे मेघालय आणि मणिपूर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्याची शिफारस कॉलेजियमने १९ एप्रिल रोजी केली होती. तथापि, अद्याप याला मंजुरी मिळालेली नाही. सुनावणीदरम्यान वेणुगोपाल यांनी सांगितले की, न्या. सुधाकर आणि न्या. मीर यांंच्या नावाचा विचार केला जाईल. त्यासंबंधीचे आदेश लवकरच जारी केले जातील. लवकर म्हणजे केव्हा? लवकर म्हणजे तीन महिने असू शकतात? अशी तीव्र प्रतिक्रिया न्यायालयाने व्यक्त केली. न्यायाधीशांची पदे रिक्त असल्याने मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा उच्च न्यायालयात गंभीर स्थिती आहे, या वस्तुस्थितीची न्यायालयाने दखल घेतली. मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या रिक्त पदांबाबत दहा दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देशही न्यायपीठाने वेणुगोपाल यांना दिले.

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारतGovernmentसरकार