शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Apple ने 150 देशात अलर्ट जारी केला, iPhone हँकिंगच्या आरोपांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:14 IST

Apple Hacking Case: टीका करण्यासाठी मुद्दा नसेल तर विरोधक हेरगिरीचे आरोप करतात, अश्विनी वैष्णप यांचा घणाघात.

Apple Hacking: मंगळवारी(दि.31) अचानक देशातील अनेक नेत्यांच्या iPhone वर अलर्ट मेसेज आला. यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर हॅकिंगचा आरोप केला. दरम्यान, केंद्र सरकारने आयफोन हॅकिंगचा विरोधकांचा दावा फेटाळून लावला आहे. केंद्रीय आयटी मंत्री अश्विन वैष्णव यांनी या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय आयटी मंत्री म्हणतात...या आरोपांवर स्पष्टीकरण देताना अश्विन वैष्णव म्हणाले की, आमच्या काही सहकाऱ्यांनी अॅपल अलर्टबाबत माहिती दिली आहे. आम्ही या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ. आमचे काही टीकाकार नेहमीच खोटे आरोप करतात. त्यांना देशाची प्रगती पाहवत नाही. अॅपलने फक्त भारतात नाही, तर 150 देशांमध्ये अलर्ट जारी केला आहे. अॅपल कंपनीने याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.

प्रियांका गांधींचा उल्लेख वैष्णव पुढे म्हणाले, विरोधी पक्षांना ही सवयच आहे. कुठलाच मुद्दा सापडत नसेल, तर हेरगिरीचे आरोप करतात. काही वर्षांपूर्वीही त्यांनी हा आरोप केला होता, त्या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली झाला, पण काहीही निष्पन्न झाले नाही. प्रियंका गांधी यांनीही आपल्या दोन मुलांचे फोन हॅक झाल्याचा दावा केला होता, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही.

मालवीय यांची टीकाअॅपलच्या स्पष्टीकरणानंतर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, राहुल गांधींनी स्वतःची खिल्ली उडवल्यानंतर काही मिनिटांतच अॅपलने निवेदन जारी करुन स्पष्टीकरण दिले. मागच्या वेळीही राहुल गांधींनी त्यांचा फोन चाचणीसाठी जमा केला नव्हता. फालतू आरोप करून त्यांनी देशाचा वेळ वाया घालवाला. अॅपलने केवळ भारतातच नाही तर जगभरातील 150 देशांमध्ये अलर्ट पाठवला आहे. यावर कंपनीही स्पष्टपणे काही सांगू शकली नाही. त्यामुळे यात सरकारचा हात आहे, असे विरोधकांनी मानणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे.

या नेत्यांचा सरकारवर आरोपकाँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) महुआ मोइत्रा आणि आम आदमी पार्टी (आप) राघव चड्ढा यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी मंगळवारी त्यांच्या आयफोनवर अलर्ट आल्याचे सांगितले. तसेच, केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप केला. 

अलर्टमध्ये काय आहे?अॅपलकडून आलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, "स्टेट स्पँसर्ड हल्लेखोर आयफोनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्लेखोर तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतात."

अॅपलने काय म्हटले?हॅकिंगच्या दाव्यांवर अॅपलने सांगितले की, "हा अलर्ट कशामुळे आला, याबद्दल आम्ही माहिती देऊ शकत नाहीत. यामुळे हॅकर्स अलर्ट होऊ शकतात. पण, आम्ही या अलर्टसाठी एखाद्या विशिष्ट हल्लेखोराला/हॅकरचे नाव घेऊ इच्छित नाही. हल्लेखोर आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या शक्तिशाली आहेत आणि हल्ले सहसा पूर्णपणे शोधले जात नाहीत," असे कंपनीने म्हटले आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारApple IncअॅपलRahul Gandhiराहुल गांधीAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक