शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, नितीशकुमारांच्या फोटोवरून पीटीआयने मागितली स्मृती इराणींची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 11:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मुखवटा घातलेल्या एका ग्रुपचा फोटो शेअर करणं ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला महागत पडलं आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मुखवटा घातलेल्या एका ग्रुपचा फोटो शेअर करणं ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला महागत पडलं आहे.माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘पीटीआय’च्या या फोटोंवर आक्षेप घेतल्यानंतर ते फोटो पीटीआयने डिलिट केले आहेत. फोटो शेअर केल्याने पीटीआयने स्मृती इराणींची माफीही मागितली आहे.

नवी दिल्ली, दि. 7- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मुखवटा घातलेल्या एका ग्रुपचा फोटो शेअर करणं  ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ (पीटीआय) या वृत्तसंस्थेला महागात पडलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘पीटीआय’च्या या फोटोंवर आक्षेप घेतल्यानंतर ते फोटो पीटीआयने डिलिट केले आहेत. हे फोटो शेअर केल्याने पीटीआयने स्मृती इराणींची माफीही मागितली आहे. जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागत असल्याचं पीटीआयने ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

नितीश कुमार यांनी केंद्राकडे निधीची मागणी केली होती. या बातमीचं ट्विट पीटीआयने केलं होतं. हे ट्विट करताना पीटीआयने नरेंद्र मोदी आणि नितीशकुमारांचा मुखवटा घातलेली मंडळी फ्रेंडशिप डे साजरा करतानाचा फोटो शेअर केला. पण हा फोटो माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना आवडला नाही. हा फोटो शेअर केल्यानंतर स्मृती इराणी यांनी ट्विटरवरच ‘पीटीआय’ला खडे बोल सुनावले. जनतेने निवडून दिलेल्या नेत्यांची तुम्ही अशी प्रतिमा निर्माण करणार का, ही तुमची अधिकृत भूमिका आहे का असा सवाल त्यांनी विचारला. यानंतर पीटीआयने भावना दुखावल्याबद्दल स्मृती इराणींची माफी मागितली आणि फोटो डिलीट केले आहेत.

पण यावर नेटीझन्सने मात्र नाराजी व्यक्त केली. मुखवटा घातलेल्या फोटोमध्ये आक्षेपार्ह काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. गौरव पांधी या युजरने पीटीआयचे ते फोटो पुन्हा ट्विट करत यात आक्षेपार्ह काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. स्मृती इराणी पीटीआयच्या कामात हस्तक्षेप का करत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पीटीआयने याआधीही स्मृती इराणींची माफी मागितली होती. मुसळधार पावसाने अहमदाबादचं सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात बुडाल्याचं आणि विमाने पाण्यावर तरंगत असल्याची ओळ देऊन ‘पीटीआय’ने अहमदाबाद विमानतळाचे फोटो प्रसिद्ध केले होते. विश्वासार्ह पण ते फोटो अहमदाबादमधील नसून २०१५ मधील चेन्नई विमानतळाची असल्याचं नंतर समोर आलं होतं. स्मृती इराणींनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर पीटीआयला माफी मागावी लागली होती. या प्रकरणावरून पीटीआयच्या एका फोटोग्राफरला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.