शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

"ज्याला चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्याला जनतेनं पंतप्रधान बनवलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 16:10 IST

आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास बसले आहेत.

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेनं देश सोपवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चाय वाला म्हटलं जाते. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाल्यानं अनेकांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता.आता पोस्टरच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी या प्रकरणात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. मालवीयनं लिहिलं आहे की, विरोधी पक्ष मोदींच्या भूतकाळातील गोष्टींवर नेहमीच त्यांना टार्गेट करतात. मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती-जमातीचा असणं हा अभिशाप आहे काय ?, असा प्रश्नही मालवीय यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, चंद्राबाबू नायडू मोदी सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणावर बसले आहेत. मोदी सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबूंनी लावून धरली आहे. रविवारी (10 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्र प्रदेशातील रॅली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली.  'जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलेच माहीत आहे. हा आंध्र प्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल, आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणे थांबवा', असा शब्दांत चंद्राबाबू नायडूंनी इशारा दिला आहे. दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला आहे.