शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

JEE परीक्षेसाठी कायपण... लेकीला दुचाकीवर बसवून बापाने केला 300 किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 15:03 IST

नालंदा ते रांची असा 300 किमीचा प्रवास आपल्या वडिलांच्या दुचाकी वाहनावरुन केल्यानंतर एका विद्यार्थीनीने परीक्षा केंद्र गाठले. बिहारच्या नालंदा येथील रहिवासी असलेल्या धनंजय कुमार यांनी तब्बल 12 तास दुचाकी चालवून आपल्या लेकीला जेईई परीक्षेसाठी रांचीला पोहोचवले.

ठळक मुद्देनालंदा ते रांची असा 300 किमीचा प्रवास आपल्या वडिलांच्या दुचाकी वाहनावरुन केल्यानंतर एका विद्यार्थीनीने परीक्षा केंद्र गाठले. बिहारच्या नालंदा येथील रहिवासी असलेल्या धनंजय कुमार यांनी तब्बल 12 तास दुचाकी चालवून आपल्या लेकीला जेईई परीक्षेसाठी रांचीला पोहोचव

रांची - कोरोना महामारीचा फटका शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला असून विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे जेईई परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाच्या सावटाखाली विद्यार्थ्यांना भीतीच्या वातावरणात परीक्षा द्यावी लागत आहे. रांचीतील एका शेतकऱ्याच्या मुलीने तब्बल 300 किमीचा प्रवास करुन जेईई परीक्षा दिली. 

नालंदा ते रांची असा 300 किमीचा प्रवास आपल्या वडिलांच्या दुचाकी वाहनावरुन केल्यानंतर एका विद्यार्थीनीने परीक्षा केंद्र गाठले. बिहारच्या नालंदा येथील रहिवासी असलेल्या धनंजय कुमार यांनी तब्बल 12 तास दुचाकी चालवून आपल्या लेकीला जेईई परीक्षेसाठी रांचीला पोहोचवले. सध्या कोरोना महामारीमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा अद्यापही सुरळीत झाली नाही. त्यातच, बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांतील नागरिकांच्या प्रवासासाठी बससेवा सुरू नसल्याने वाहतूकीची मोठी समस्या आहे. त्यामुळे, धनंजय कुमार यांनी नालंदा जिल्ह्यातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आठ तासाच्या प्रवासानंतर ते बोकारो येथे पोहोचले होते. त्यानंतर, आणखी 135 किमीचा दुचाकी प्रवास करत ते सोमवारी दुपारी रांचीला पोहोचले. रांची येथे त्यांच्या मुलीचे जईई परीक्षा केंद्र होते.

नालंदा ते रांची प्रवासासाठी सध्या मोटारसायकल हाच पर्याय आहे. कोरोना व्हायरसमुळे बससेवा सुरू नाही व चारचाकी खासगी वाहनांचे भाडे परवणारे नसल्यामुळे मी मुलीला दुचाकीवरुन 300 किमी प्रवास केल्याचे धनंजयकुमार यांनी सांगितले. बोकारो ते रांची जात असताना मला झोप येऊ लागली. त्यामुळे, काही वेळ झोप घेऊन मी पुढील प्रवास केला. दरम्यान, झारखंडच्या 10 केंद्रांवर जवळपास 22,843 विद्यार्थी परीक्षेत सहभागी आहेत. 

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना संधी?   पूरग्रस्त भागात असलेल्या ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा होऊ शकणार नाही त्या केंद्रावरील विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून एक संधी देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, जे परीक्षार्थी परीक्षा न देता काही बहाणा देत असतील अशांना संधी मिळणार नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक डॉ. विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, जेईई मुख्य परीक्षेवर सध्या लक्ष केंद्रीत केलेले आहे. या परीक्षेला ९.५३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी ही परीक्षा ८ टप्प्यात झाली होती. यंदा ती दोन सत्रात सलग सहा दिवस म्हणजे १२ टप्प्यात होणार आहे.

टॅग्स :ranchi-pcरांचीexamपरीक्षाJharkhandझारखंड