शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत धक्का; भाजपा नेत्याला ईव्हीएमवर शंका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 11:28 IST

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा तिन्ही विधानसभा मतदारसंघात पराभव

कोलकाता: पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर आता भाजपानं ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केली आहे. विधानसभेच्या तीन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केले. राज्य सरकारच्या यंत्रणेनं तृणमूल काँग्रेसला उघडपणे मदत केली. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंदेखील सिन्हा म्हणाले.निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवलं जातं. मात्र पोटनिवडणुकीच्या कामावर राज्य सरकारच्या प्रशासनाचं लक्ष असतं. तृणमूल काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, असं सिन्हा यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले. सिन्हा यांनी ईव्हीएमबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ईव्हीएमसोबत काहीही केलं जाऊ शकतं. ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही. सत्ताधारी पक्षाकडून मतमोजणीवेळी घोटाळा केला जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. आपल्या दाव्याचं समर्थन करताना सिन्हा यांनी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. 'लोकसभा निवडणुकीवेळी भाजपानं कालियागंज आणि खरगपूर विधानसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. कालियागंज आणि करीमपूरमध्ये भाजपाला २०१६ च्या तुलनेत जास्त मतं मिळाली होती. मग आम्ही सर्व मतदारसंघात कसे काय पराभूत होऊ शकतो? तृणमूलनं पहिल्यांदाच खरगपूर मतदारसंघात विजय मिळवला आहे. त्यामुळे शंका घेण्यास वाव आहे,' असे सिन्हा म्हणाले. कालियागंज विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तपन देब सिन्हा यांनी निकटचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे उमेदवार कमलचंद्र सरकार यांचा २४१८ मतांनी पराभव केला. खरगपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार प्रदीप सरकार यांनी भाजपच्या प्रेमचंद झा यांचा २०,८११ मतांनी, तर करीमपूर विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या बिमलेंदू सिन्हा रॉय यांनी भाजपच्या जयप्रकाश मजुमदार यांचा २३,६५० मतांनी पराभव केला. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालEVM Machineएव्हीएम मशीन