शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

जो बापाचा नाही झाला, तो जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही- मुलायम सिंह यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 5:52 PM

समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष आणि संरक्षक मुलायम सिंह यादव यांनी नवा पक्ष काढण्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन मुलायम सिंह यांनी ही घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, दि. 25 - समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष आणि संरक्षक मुलायम सिंह यादव यांनी नवा पक्ष काढण्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन मुलायम सिंह यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली आहे. जो बापाचा झाला नाही, तो जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही, असंही मुलायम सिंह यादव म्हणाले आहेत. अखिलेश माझे पुत्र आहेत. माझा त्यांना आशीर्वाद आहे. मात्र त्यांच्या निर्णयाशी मी सहमत नाही. राम मनोहर लोहिया ट्रस्टमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे.ते म्हणाले, पेट्रोलवरही जीएसटी लावलं पाहिजे होतं. नोटाबंदीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. बीएचयूमध्ये विद्यार्थिनींसोबत छेडछाडही होतेय. माझ्या कार्यकाळात जनतेसाठी पुरेशी वीज उपलब्ध होती. मात्र आता अनेक ठिकाणी वीज नाही. शेतक-यांचं एक लाखापर्यंतच कर्ज माफ केलं पाहिजे होतं. कर्जमाफीवरून शेतक-यांशी खेळलं जातंय. तसेच शिक्षण विभागावरही अन्याय होतोय. जनतेला मोफत औषधं, शिक्षण, सिंचन मिळालं पाहिजे. तरुणांना अजूनही रोजगार मिळत नाही. तसेच समाजवादी विचारधारेच्या व्यक्तींनी समाजवादी पक्षात सामील व्हावं. समाजवादी पक्ष गाव, गल्लीबोळ्यात सगळीकडे पसरला आहे.अखिलेशनं माझ्याकडे तीन महिन्यांचा वेळ मागितला होता. त्यानंतर मला अध्यक्ष करतो, असंही तो म्हणाला होता. मात्र तो त्याच्या विधानावर ठाम राहिला नाही. बापाला धोका देणारी अशी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. जो बापाचा नाही तो कोणाचाच नाही, असं देशातील मोठ्या जाणकार व्यक्तींनी सांगितलं आहे.  तसेच मी कोणताही नवा पक्ष स्थापन करत नाहीये, असंही मुलायम सिंह यादवांनी स्पष्ट केलं आहे. अखिलेश आणि शिवपाल दोघेही समाजवादी पार्टीसोबत आहेत. मात्र समाजवादी पार्टीच्या राज्य संमेलनात अखिलेशनं शिवपालला आस्तिनचा साप असंही संबोधलं होतं. आम्ही समाजवादी पार्टीसोबत आहोत. मात्र आग्रा येथे होणा-या समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनात मी सहभागी होणार नाही. वर्ष उलटून गेलं तरी समाजवादी पार्टीतील अंतर्गत मतभेद संपण्याचं काही नाव घेत नाहीयेत.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टी