शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 1.3 कोटी रुपयांत नागरिक व्हा; फरार मेहुल चोक्सी कोणत्या देशात चैन करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 13:07 IST

मेहुल चोक्सीसारखे आरोपी कॅरेबियन बेटांमधील देशांमध्ये आश्रय घेतात.

नवी दिल्ली- तुमच्याकडे एक कोटी ते सव्वा कोटी रुपये आहेत का?  मग तुम्हाला एका देशाचे नागरिकत्त्व सहज मिळू शकते. कॅरेबियन बेटांमधील अनेक लहानहान देश भारतातून पळून आलेल्या गुन्हेगारांना पैशाच्या मोबदल्यामध्ये नागरिकत्त्व देत आहेत. यामध्ये अँटिग्वाचे स्थान एकदम वर आहे. पीएनबी घोटाळ्याचा आरोप असणारा मेहुल चोक्सी अँटिग्वाला गेला आहे, अशी माहिती उघड झाली आहे. केवळ 1.3 कोटी रुपयांमध्ये त्याला अँटिग्वा नागरिकत्व व दुसरा पासपोर्ट देऊ शकेल.अँटिग्वा आणि बार्बाडोस नागरिकत्वासाठी गंतवणूक योजना 2012 साली जाहीर झाली. यानुसार ज्या व्यक्तीला त्या देशाचे नागरिकत्व आहे ते काही रक्कम रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवू शकतात किंवा निधी देऊ शकतात. त्यासाठी  पर्याय देण्यात आले आहेत. अँटिग्वा विकास निधीला 2 लाख डॉलर्स देणे, तेथील रिअल इस्टेटमध्ये 4 लाख डॉलर्स गुंतवणे किंवा तेथील व्यवसायात 15 लाख डॉलर्स गुंतवणे असे कोणेही पर्याय वापरता येऊ शकतात. मेहुल चोक्सीच्या आर्थिक ताकदीच्या मानाने हे सर्व आकडे किरकोळ म्हणावे लागतील. या पासपोर्टबरोबर 132 देशांमध्ये व्हीसाविना प्रवास करण्याची सुविधाही त्याला मिळणार आहे. असे असले तरी अँटिग्वाच्या नागरिकत्वासंबंधी संकेतस्तळावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना नागरिकत्व मिळणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. मात्र आजवर अनेक घोटाळेबाजांनी अशा प्रकारचे मार्ग वापरुन लहान देशांमध्ये नागरिकत्व मिळवून चैनीत जगण्याचा मार्ग अवलबंला आहे. पीएनबी घोटाळ्यात बँकेची व पर्यायाने भारत देशाची फसवणूक करणाऱ्या मेहुलला अँटिग्वासारखे देश स्वर्गच आहेत.सेंट किट्स आणि नेवीसचा पायपोर्टही सहज मिळू शकतो. 1.3 कोटी रुपये दिले की या देशाचा पासपोर्ट केवळ चार महिन्यांमध्ये हातात पडतो. हे पैसे सेंट किट्स शाश्वत विकास निधीमध्ये द्यायचे किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवायचे की पासपोर्ट मिळतो. तसेच यामुळे जगभरातील 141 देशांमध्ये व्हीसाविना जाताही येतं. यामध्ये भारत आणि इंग्लंड देशांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर डॉमिनिका रिपब्लिकमध्ये 68 लाख रुपयांचा निधी दिला की तुम्ही प्रत्यक्षात तेथे न जाता पासपोर्ट मिळतो. त्याबरोबर तुम्हाला जगातील 115 देशांमध्ये व्हीसाविना फिरता येऊ शकतं. त्यामध्ये युरोपियन युनीयमधील देश, हाँगकाँग, सिंगापूर, स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकCorruptionभ्रष्टाचार