शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा; महिलेची कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:06 IST

२२ जानेवारीस हजर राहण्याचे आदेश; डीएनए चाचणी करण्याची अर्जदाराची मागणी

तिरुवनंतपुरम : आपण ख्यातनाम पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची रक्ताची मुलगी असल्याचा दावा करमाला मोडेक्स या ४५ वर्षीय महिलेने केला असून, तसा जाहीरनामा मिळविण्यासाठी येथील कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली आहे.करमाला विवाहित असून, त्यांना तीन मुले आहेत. त्यांनी दाखल केलेल्या दाव्याच्या आधारे न्यायालयाने अनुराधा पौडवाल व त्यांच्या दोन मुलांना येत्या २२ जानेवारीस हजर होण्याचे समन्स काढले आहेत. अनुराधा आणि त्यांचे संगीतकार पती अरुण पौडवाल यांनी आपले पालकत्व नाकारले, तर ते सिद्ध करण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यात यावी, अशी मागणी करमाला यांनी दाव्यात केली आहे.बालपणात आणि पुढील आयुष्यातही वास्तविक जे सुख मिळायला हवे होते, ते नाकारल्याबद्दल पौडवाल दाम्पत्याने ५० कोटी रुपये भरपाई द्यावी, तसेच या दाव्याचा निकाल होईपर्यंत पौडवाल यांना त्यांच्या कोणत्याही मालमत्ता विकण्यास मनाई करावी, अशीही त्यांनी न्यायालयास विनंती केली आहे.करमाला यांनी म्हटले आहे की, आयुष्यभर ज्यांना आपण वडील मानले त्या पोन्नाचेन यांनी मृत्यूच्या काही दिवस आधी ‘मनावरील ओझे कमी करण्यासाठी’ आपण अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचे उघड केले. करमाला यांच्या म्हणण्यानुसार मृत्युशय्येवरील पोन्नाचेन यांनी त्यांना सांगितले की, पूर्वी भारतीय लष्करात नोकरी करीत असताना ते महाराष्ट्रात नियुक्तीवर होते व तेथे त्यांची अनुराधा पौडवाल यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी अनुराधा पौडवाल यांना एक मुलगी (म्हणजेच आताची करमाला) झाली. गायन व्यवसायाच्या व्यग्र दिनचर्येत मुलीचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही, असे सांगून अनुराधा पौडवाल यांनी चार दिवसांची मुलगी आपल्या स्वाधीन केली. (वृत्तसंस्था)आईलाही नव्हते माहीतआपण जिला लहानाचे मोठे केले ती अनुराधा पौडवाल यांची मुलगी आहे हे माझी सांभाळ करणारी आई अ‍ॅग्नेस हिलाही माहीत नव्हते, असा दावाही करमाला यांनी केला आहे.करमाला यांच्या म्हणण्यानुसार केरळमधील पोन्नाचेन आणि अ‍ॅग्नेस या दाम्पत्याने त्यांच्या तीन मुलांसोबत सांभाळ करून आपल्याला लहानाचे मोठे केले.पोन्नाचेन यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून सध्या ८५ वर्षांच्या असलेल्या अ‍ॅग्नेस ‘अल्झायमर’ विकाराने आजारी आहेत.

टॅग्स :Anuradha Paudwalअनुराधा पौडवाल