शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या चेअरमनपदी अनुपम खेर यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 17:06 IST

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज केली. गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या चेअरमनपदावरील नियुक्ती वादग्रस्त ठरली होती.  अनुपम खेर यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी 500  हून अधिक चित्रपटांमधून काम केले असून, त्यापैकी कर्मा, चायना गेट, दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे, कुछ कुछ होता है असे चित्रपट विशेष गाजले होते. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना पद्मश्री (2004) आणि पद्मभूषण (2016) या पुरस्कारांनी गौरवले आहे. तसेच खेर यांनी याआधी  सेंसॉर बोर्ड आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे चेअरमन म्हणून काम पाहिले होते.  

 

दरम्यान, एफटीआयआयचे माजी चेअरमन गजेंद्र चौहान यांनी अनुपम खेर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "एफटीआयआयचे नवे चेअरमन म्हणून अनुपम खेर  यांची नियुक्ती झाली आहे. ते चांगले काम करतील, अशी अपेक्षा आहे. मी त्यांना भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा देतो," असे गजेंद्र चौहान म्हणाले.  

अनुपम खेर यांच्याआधी एफटीआयआयच्या चेअरमनपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सुरुवातीपासूनच त्यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत तब्बल १३९ दिवसांचा संप पुकारला होता. मात्र विद्यार्थ्यांचा विरोध झुगारून सरकारने गजेंद्र चौहान यांना एफटीआयआयच्या चेअरमनदावर कायम ठेवले होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली होती.  

नियामक मंडळावरील नियुक्त्या या तीन वर्षांसाठी असतात. चौहान यांच्या अध्यक्षपदाची कारकीर्द ही ४ मार्च २०१४ पासून ग्राह्य धरण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ९ जून २०१५ रोजी एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांनी गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून रणकंदन माजवित आंदोलनाचे शस्त्र उगारले. १२ जून रोजी सुरू झालेला हा संप देशातील सर्वांत लांबलेल्या संपांपैकी एक ठरला. चौहान यांनी संप संपुष्टात आल्यानंतर ७ जानेवारी २०१६ ला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेर