शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतली, पण एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:46 IST

Corona Vaccination: सीरम, आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओविरोधात व्यापारी पोलीस ठाण्यात

लखनऊ: कोविशील्ड लसीची निर्मिती करणाऱ्या  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि या लसीला परवानगी देणाऱ्या आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओविरोधात लखनऊमधील एका व्यापाऱ्यानं एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आपल्या शरीरात एँटीबॉडी तयार न झाल्याचा दावा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या प्रताप चंद्र यांनी केला आहे. रुग्णांमध्ये दिसतोय 'लॉन्ग कोविड', 6 महिन्यांपर्यंत राहतात लक्षणं; एम्सचे डॉ. नीरज निश्चल यांनी दिली महत्वाची माहितीकोविशील्डची लस घेतल्यानंतर शरीरात एँटीबॉडीज तयार होत नाहीत. हा लोकांसोबत केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात आणि या लसीला मंजुरी देणाऱ्या संस्थांविरोधात कारवाई व्हायला हवी, अशी मागणी प्रताप चंद्र यांनी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, जागतिक आरोग्य संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ट्रेड्रोस एधोनम, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालिका अपर्णा उपाध्याय यांच्या विरोधात प्रताप चंद्र यांनी लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.लस घेतल्यानंतर दंडात येतो करंट? त्या विजेने बल्बही पेटतो?; जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओमागचं सत्यया प्रकरणाच्या तपासासाठी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम गुप्ता यांनी दिली. 'लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार होतील, असं आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओनं स्पष्ट म्हटलं होतं. पण माझ्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या नाहीत. सीरमनं या लसीचं उत्पादन केलं आहे. आयसीएमआर, डब्ल्यूएचओ आणि आरोग्य मंत्रालयानं या लसीला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशननं या लसीचा प्रचार केला. त्यामुळे सगळे दोषी आहेत,' असं प्रताप चंद्र म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या