शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवादविरोधी मोहिमेला यश; 17 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:56 IST

या वर्षी आतापर्यंत 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा खात्मा करण्याचा प्रण घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नक्षलवाद्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. तर, या कारवाईला घाबरुन अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणदेखील करत आहेत. याच क्रमाने छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात गुरुवारी 17 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी 9 जणांवर 24 लाख रुपयांचे बक्षीस होते. 

पोलिसांच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये एका जोडप्याचाही समावेश आहे. विजापूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव म्हणाले की, या नक्षलवाद्यांनी माओवाद्यांची पोकळ आणि अमानवी विचारसरणी, वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून निष्पाप आदिवासींचे होणारे शोषण आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावाबद्दल निराशा व्यक्त केली.

'निया नेल्लानार' (तुमचे चांगले गाव) योजनेवर नक्षलवाद्यांचाही प्रभाव आहे, ज्या अंतर्गत सुरक्षा दल आणि प्रशासन मूलभूत सुविधा पुरविण्याचा आणि अंतर्गत भागात विकास कामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्मसमर्पण केलेले सर्व नक्षलवादी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या गांगलूर एरिया कमिटीमध्ये विविध पदांवर सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.

नक्षलवाद्यांवर लाखोंचे बक्षीसमाओवादी विभागीय समितीचा सदस्य दिनेश मोदियम (36) हा विजापूर जिल्ह्यातील 26 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता आणि त्याच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याची पत्नी ज्योती टाटी उर्फ ​​काला मोडियम (32) आणि दुला करम (32), दोघेही क्षेत्र समिती सदस्य म्हणून सक्रिय होते आणि त्यांच्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण करणाऱ्या इतर सहा जणांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस होते.

यावर्षी 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण यादव पुढे म्हणाले की, या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर, स्पेशल टास्क फोर्स, सीआरपीएफ आणि त्याची एलिट युनिट कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्वांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, त्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षी आतापर्यंत राज्यातील बस्तर रेंजमधील विजापूर जिल्ह्यात 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेल्या वर्षी विजापूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर भागात 792 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडAmit Shahअमित शाह