शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाचा मुकाबला करू शकतात HIV वरची दोन औषधं?; उत्पादन वाढवण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 12:55 IST

कोरोनाच्या रुग्णांवर HIVसाठी वापरण्यात येणारी औषधं Lopinavir अन् Ritonavirचा चांगला प्रभाव पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं फॉर्मा कंपन्यांना दोन्ही औषधांचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देकोरोनावर कोणतंही औषध उपलब्ध नसल्यानं याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. भारतातही कोरोनानं एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता भारतीय वैद्यकीय तज्ज्ञांनी या विषाणूवर उपचार शोधण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर HIVसाठी वापरण्यात येणारी औषधं Lopinavir अन् Ritonavirचा चांगला प्रभाव पडत आहे.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीन, इटली अन् दक्षिण कोरियाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनावर कोणतंही औषध उपलब्ध नसल्यानं याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. भारतातही कोरोनानं एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता भारतीय वैद्यकीय तज्ज्ञांनी या विषाणूवर उपचार शोधण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना व्हायरस (Covid-19)वर लस विकसित करण्यासाठी वर्ष ते दीड वर्षं लागू शकतात, असा दावा या वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. त्यातच आणखी एक चांगली माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या रुग्णांवर HIVसाठी वापरण्यात येणारी औषधं Lopinavir अन् Ritonavirचा चांगला प्रभाव पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं फॉर्मा कंपन्यांना दोन्ही औषधांचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं औषध कंपन्यांबरोबर मोठी बैठक घेतली होती. या बैठकीत वैद्यकीय तज्ज्ञांनी सिपला, मायलन, ऑरोबिंदो आणि इतर कंपन्यांना एचआयव्हीवर रामबाण ठरणाऱ्या औषधांचं उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला आहे. Lopinavir अन् Ritonavirचं अँटी रेट्रोवायरल औषधं आहेत. ही औषधं एचआयव्हीला शरीरातल्या इतर नसांमध्ये पसरण्यापासून रोखतात. भारत सध्या दोन्ही औषधांची निर्यात आफ्रिकी देशात करतो. इकोनॉमिक्स टाइमच्या हवाल्यानुसार मंत्रालयातले अधिकारी म्हणाले, कंपन्यांना दोन्ही औषधांचा पुरवठा आणि उत्पादन वाढवण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच या औषधांच्या निर्यातीवर कोणतीही बंधनं लादण्यात आलेली नाहीत. इटलीतून भारतात आलेल्या दाम्पत्यावर उपचारासाठी Lopinavir अन् Ritonavirचा वापर करण्यात आला. जयपूरमधल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या दोन्ही औषधांच्या वापरानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही प्रमाणात यश येत असल्याचं उघड झालं आहे.  इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, दोन्ही औषधे या जोडप्याच्या संमतीने दिली गेली आहेत. त्याचा परिणाम चांगला झाला. 14 दिवसांनंतर ते आता जवळजवळ निरोगी आहेत. भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने आयसीएमआरला परवानगी दिली आहे की, एचआयव्ही-विरोधी औषधे Covid-19वरच्या उपचारांसाठी वापरता येतील. कोरोना विषाणूचा सध्या कोणताही इलाज उपलब्ध नाही.

टॅग्स :corona virusकोरोना