शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्या! काँग्रेसचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 05:48 IST

मोदी सरकारने ४ वर्षांत जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही विविध शासकीय संस्थांची आकडेवारी आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आमचे म्हणणे खोडून काढण्यासाठी हिंमत असेल तर आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्यावे.

मुंबई - मोदी सरकारने ४ वर्षांत जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही विविध शासकीय संस्थांची आकडेवारी आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आमचे म्हणणे खोडून काढण्यासाठी हिंमत असेल तर आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्यावे. लोक काही घास खात नाहीत हे लक्षात ठेवावे, अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपावर हल्लाबोल केला.देशातले कोणतेही क्षेत्र आज सुरक्षित राहिलेले नाही. धमक्या, पैशांचे आमिष नाहीतर कायद्याच्या कचाट्यात अडकवणे, असे सुडाचे राजकारण भाजपाने सुरू केले आहे. काँग्रेसमुक्त भारत घोषणा करताना मात्र त्यांना निवडून येण्यासाठी आमच्या सारख्या पक्षातलेच लोक लागत आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. कल्पनेच्या पलिकडे भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आहे. आम्ही सरकारच्या कामाचे मूल्यमापन त्यांनी दिलेल्या आकडेवारीच्याच आधारे केले आहे, असे सांगत सिंघवी यांनी ‘विश्वासघाताची ४ वर्षे’ ही पुस्तिकाच सादर केली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आदींची उपस्थिती होती.पीक विमा योजनेत कंपन्यांचे झाले सोने!पंतप्रधान पीक विमा योजनेत २०१६-१७ मध्ये शासनाने २०,४७८ कोटी रुपये विमा कंपन्यांना हप्ता म्हणून दिले.कंपन्यांनी फक्त ५,६५० कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना दिले आणि १४,८२८ कोटी रुपये विमा कंपन्यांनी लाटले!काँग्रेसने ‘आरबीआय’च्या अहवालाचाहवाला देत दिलेली आकडेवारी अशी...च्२००४ ते २०१४ या काळात ४.२ टक्के असलेला कृषी विकास दर २०१४-१८ मध्ये १.९ टक्के झाला.च्आघाडी सरकारच्या काळातील मनरेगाच्या कामाचे दिवस ४५ दिवस आता केवळ १६.३ झाले आहेत.च्पंतप्रधानांनी किमान हमीभाव देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले. नंतर चारच महिन्यांनी सर्वाेच्च न्यायालयात असा हमीभाव देता येणार नाही, असे शपथपत्र दिले. आता वित्तमंत्री हमीभाव दिल्याचे सांगत आहेत. एकाही पिकाला खर्च अधिक ५० टक्के नफा, असा भाव मोदी सरकारने दिलेला नाही.च्महाराष्टÑात ८९ लाख शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. प्रत्यक्षात ३० लाख शेतकºयांना कर्जमाफी नाकारली.च्भाजपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात ११,७०० शेतकºयांना फक्त १ रुपया ते ५०० रुपये अशी कर्जमाफी दिली.चार वर्षांत ५० हजारशेतकरी आत्महत्या२०१४-१५ १२,३६०२०१५-१६ १२,६०२२०१६-१७ ११,४५८२०१७-१८ १४,०००एकूण ५०,४२०नोकºया देण्याचे खोटे आश्वासनच्पंतप्रधानांंनी दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात २०१६-१७ मध्ये फक्त ४.१६ लाख नोकºया दिल्या. (लेबर ब्युरोचा अहवाल)च्फेब्रुवारी २०१८ मध्ये भारतात ३.१० कोटी तरुण बेरोजगार होते. (सीएमआयई)च्२०१९ पर्यंत ७७ टक्के भारतीय श्रमिक नोकºयांसाठी वणवण भटकतील. (आईएलओ)च्नोटबंदीमुळे १५ लाख नोकºया संपुष्टात आल्या. (सीएमआईई)च्एचवन बी व्हिसाची मुदत संपताच ७.५ लाख भारतीय परत येतील.च्आयटी क्षेत्रात ५० हजार तर टेलिकॉममध्ये ९० हजार नोकºया गेल्या.एकूण भारतीय आयटी कर्मचारी : ३९ लाखदोन वर्षांत अपेक्षित नोकरकपात : १७ लाख ५२ हजाररिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार -२००८च्या चौथ्या तिमाहीत बँकांना४४,५४२कोटींचा तोटा अपेक्षित१ लाख कोटीरुपयांच्या फसवणुकीची२३ हजारप्रकरणे समोर आली.११बँक घोटाळ्यांत६१,०३६कोटींचा फटका

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार