शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सचिव मारहाण प्रकरण; आप आमदारांना कोर्टाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 17:19 IST

दिल्लीच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांच्या घरीच झालेल्या धक्काबुक्कीचे प्रकरण आम आदमी पार्टीला चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने आम आदमी पक्षाच्या आमदारांची आणखी एक याचिका रद्द केली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांच्या घरीच झालेल्या धक्काबुक्कीचे प्रकरण आम आदमी पार्टीला चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने आम आदमी पक्षाच्या आमदारांची आणखी एक याचिका रद्द केली आहे. या याचिकेत आप आमदारांनी दिल्लीचे मुख्य सचिव प्रकाश मारहाण प्रकरणाची माहिती पोलिसांनी माध्यमांना देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांना अशी माहिती देण्यापासून रोखता येणार नाही, असे सांगत कोर्टाने या आमदारांची मागणी रद्दबातल ठरवली. या प्रकरणातील आरोपपत्रावर 18 सप्टेंबर पुढील कार्यवाही होणार आहे.

दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आम आदमीच्या 11 आमदारांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आज या आरोपपत्रातील तपशील माध्यमांमध्ये देण्यास पोलिसांना रोखावे या आपच्या मागणीवर दिल्ली पोलिसांनी आपले उत्तर सादर केले. आपचे नेते दिल्ली पोलिसांचा अवमान होईल अशी टिप्पणी करत आहेत, आमची प्रतिमा खराब करुन न्यायालयाच्या कार्यवाहीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत अशी बाजू दिल्ली पोलिसांनी मांडली.

यावर आम आदमी पार्टीच्या वकिलांनी हे प्रकरण साधे नाही. मुख्य सचिव तक्रारदार असून मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत असे सांगितले. दिल्ली पोलीस मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न करत आहेत असे मत मांडले मात्र न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या खटल्याची माहिती माध्यमांना देण्यापासून रोखता येणार नाही असे स्पष्ट केले. 19 जानेवारीच्या रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आप आमदारांनी आपल्याला मारहाण केली अशी तक्रार अंशु प्रकाश यांनी केली आहे. त्यानंतर आपच्या दोन आमदारांना अटक करण्यात आली व त्यांची जामिनावर सूटका करण्यात आली.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCourtन्यायालय