शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अन्सारींनी जिथं सुरक्षित वाटतं त्या देशात जावं,'संघा'ने घेतला समाचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 19:41 IST

देशातील मुस्लिमांमध्ये अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षततेची भावना असल्याचं वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी  पदावरून पायउतार होताना केलं होतं.

नवी दिल्ली, दि. 13 - देशातील मुस्लिमांमध्ये अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षततेची भावना असल्याचं वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी  पदावरून पायउतार होताना केलं होतं. या वक्तव्यावरून  राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) नेते इंद्रेश कुमार यांनी अन्सारींवर जोरदार टीका केली आहे. अन्सारींनी त्यांना जिथं सुरक्षित वाटतं, अशा एखाद्या देशात गेले पाहिजे असं कुमार म्हणाले. राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने आयोजित राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात इंद्रेश कुमार बोलत होते.  माजी उपराष्ट्रपतींचे वक्तव्य दुर्दैवी आहे. अन्सारी हे पूर्वी भारतीय होते पण आता ते जातीयवादी झाले आहेत, ते पूर्वी सर्वपक्षीय नेते होते. पण ते आता काँग्रेसवादी झाले आहेत. अन्सारींनी केलेले वक्तव्य मुसलमान समाजातही ऐकणारे कोणी नाही.  गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना नव्हती पण आता त्यांना असुरक्षित वाटतंय, अन्सारींनी त्यांना जिथं सुरक्षित वाटतं, अशा एखाद्या देशात गेले पाहिजे असं इंद्रेश कुमार म्हणाले. काय म्हणाले होते अन्सारी- 'असहिष्णुतेचा मुद्दा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहका-यांसमोर उपस्थित केला आहे'. देशातील नागरिकांच्या राष्ट्रीयत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अत्यंत विचलित करणारं असल्याचंही ते बोलले आहेत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपला कार्यकाळ संपत असतानाच असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्याला वाटत असलेली चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलून दाखवली का असं विचारलं असता हमीद अन्सारी यांनी होकार दिला. हमीद अन्सारी पुढे बोलले की, तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, कथित घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेकी, अंधश्रद्धेचा विरोध करणाऱ्यांची हत्या या घटना भारतीय मूल्यांना, संस्कृतीला मारक ठरत आहेत. आपल्याच नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकाऱ्यांची क्षमताही वेगवेगळ्या स्तरावर कमी पडत आहे.'देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृती अतिशय चिंताजनक आहे', असं अन्सारी बोलले आहेत.देशातील मुस्लिमांच्या मनात शंकेचं वातावरण आहे, आणि ज्या प्रकारची वक्तव्यं त्यांच्याविरोधात येत आहेत त्यामुळे त्यांच्यात असुरक्षततेची भावना जागी होत आहे का ? असा प्रश्न विचारला असता हमीद अन्सारी यांनी सांगितलं की, 'देशातील वेगवेगळ्या भागांमधून जे ऐकायला मिळत आहे त्यावरुन तुमचा अंदाज योग्य आहे. मी बंगळुरुत ही गोष्ट ऐकली होती. देशातील अन्य भागांमध्येही ऐकलं आहे. उत्तर भारतात या गोष्टी जास्त प्रमाणात ऐकायला मिळतात. अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षिततेची भावना मनात घर करत आहे'.