शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका न्यायाधीशाचा बळी: राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:44 IST

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी घेत असलेल्या न्यायमूर्तींकडील काम काढण्यामागे सरकारचा दुष्ट हेतू...

नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी घेत असलेल्या न्यायमूर्तींकडील काम काढण्यामागे सरकारचा दुष्ट हेतू असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला आहे.या चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी करीत असलेल्या न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्याकडे शनिवारी अटकपूर्व जामीन व जामीन अर्जांच्या सुनावणीचे काम दिले गेले. डेरे यांच्या कामात केलेला बदल नेहमीच्या कामाचा भाग असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरद्वारे हा बदल हेतूत: केल्याचे म्हटले. गांधी म्हणाले की, सोहराबुद्दीन प्रकरणाने आणखी एका न्यायाधीशाचा बळी घेतला आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याला आव्हान दिलेल्या रेवती डेरे यांना तेथून हलविण्यात आले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना न्यायालयात हजर राहा, असे सांगणारे न्या. जे. टी. उत्पात यांना हलविण्यात आले. न्या. लोया यांचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सुनावणी दरम्यान रेवती मोहिते-डेरे यांनी न्यायालयाला सीबीआयकडून पुरेसे साह्य मिळत नसल्याचे वारंवार म्हटले होते. गांधी यांच्या आरोपाला हा संदर्भ होता.न्या. उत्पात यांनाही केले होते दूर-त्या आधी न्या. उत्पात यांनी भाजपाचे तत्कालीन सरचिटणीस अमित शाह समन्स बजावूनही, न्यायालयात हजर राहत नसल्याबद्दल त्यांना खडसावल्यानंतर त्यांना काहीच दिवसांत जून २०१४ मध्ये या खटल्यातून दूर करण्यात आले होते. उत्पात यांच्या जागी न्या. बी. एच. लोया यांची नियुक्ती केली गेली. डिसेंबर २०१४ मध्ये लोया यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर, शाह या खटल्यात निर्दोष जाहीर झाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहSohrabuddin Sheikh encounter caseसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणCBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरण