शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
6
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
7
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
8
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
9
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
10
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
11
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
12
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
13
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
14
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
15
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
16
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
17
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
18
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
19
BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
20
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल

ब्ल्यू व्हेल गेमचा अजून एक बळी, बंगालमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 10:07 IST

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या  ब्ल्यू व्हेल गेम चॅलेंजने अजून एक बळी घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये या ऑनलाइन गेमच्या आहारी जात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

कोलकाता, दि. 13 - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या  ब्ल्यू व्हेल गेम चॅलेंजने अजून एक बळी घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये या ऑनलाइन गेमच्या आहारी जात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. हा विद्यार्थी दहावीत शिकत होता. ही घटना पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे घडली आहे. मुंबईतील अंधेरी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्यानंतर भारतात ब्ल्यू व्हेल गेमची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ब्लू व्हेल गेमपायी घर सोडणाऱ्या मुलाला पुणे  पोलिसांनी वाचवले होते. तर इंदूरमध्ये शाळा सुरू असताना  इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असताना त्याच्या मित्रांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले होते.  या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्याने ब्ल्यू ब्हेल गेमपायी आत्महत्या केली आहे. या ऑनलाइमन गेममधील स्टेप पूर्ण करताना मिळालेल्या सूचनेनुसार या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. सोशल मीडिया माध्यमातून ‘ब्ल्यू व्हेल’ गेमबद्दलची चर्चा गाजत असताना बुधवारी जुळे सोलापुरातील १४ वर्षांचा मुलगा यात अडकल्याचे उघडकीस आले. सोलापूर ग्रामीण पोलील दलातील अमोल यादव, भिगवण पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने हा मुलगा सुखरुप त्यांच्या आई-बाबांना मिळाला; मात्र तमाम पालक हादरले आहेत. पोलीस प्रशासनानेही तातडीने या गेमचे गांभीर्य ओळखून शहर आणि जिल्ह्यात शाळांमध्ये मुलांमध्ये जनजागरण करण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश देण्यात आले आहेत.  ब्ल्यू व्हेल या गेममध्ये मुला-मुलींना सोशल मीडियावरून संपर्क करण्यात येतो. यात दररोज एक याप्रमाणे ५० दिवस काही काम करण्यास सांगितले जाते. जसे की आज रात्री बारा वाजता उठा, उद्या सकाळी अमुक टेकडी चढा, परवा काय तर अमुक हॉरर चित्रपट बघा, अशी कामे दररोज करण्यास सांगितले जाते. अखेर शेवटच्या दिवशी सहभागींना आत्महत्या करण्याचे आवाहन गेमद्वारे केले जाते. त्यानुसार जगभरात अनेक मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.