शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांना आणखी एक दिलासा, उच्च न्यायालयानं पूर्ण केली मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 19:06 IST

केजरीवाल यांना 21 मार्चरोजी मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना ईडी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मात्र, आता ते सीबीआय केसमुळे कारागृहात आहेत.

कथित मद्य घोटाळाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वकिलांसोबतच्या बैठकांची संख्या वाढविण्यासंदर्भातील त्यांची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाच्या मंजूरीनंतर, आता ते कारागृहातून आपल्या वकीलांसोबत दर आठवड्याला दोन अधिकच्या बैठका करू शकतील.

केजरीवाल यांना 21 मार्चरोजी मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना ईडी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मात्र, आता ते सीबीआय केसमुळे कारागृहात आहेत.

यासंदर्भात जस्टिस नीना बंसल कृष्णा म्हणाले, 'विशेष परिस्थितीत विशेष उपायांची आवश्यकता असते. निष्पक्ष ट्रायलचा मुलभूत अधिकार आणि प्रभावी कायदेशीर प्रतिनिधित्वाला मान्यता देत, याचिकाकर्त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वकिलांशी दोन अतिरिक्त बैठकांची परवानगी देण्यात येत आहे. तसेच, केजरीवाल जोवर कारागृहात असतील, तोवर त्यांना ही सुविधा मिळत राहील. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने 18 जुलैरोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला होता. 

यासंदर्भात, कायदा सर्वांसाठी समान असल्याचे म्हणत,  अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या मागणीला विरोध केला होता. तसेच, आम आदमी पक्षाचे प्रमुख सध्या देशभरात सुमारे 35 खटल्यांचा सामना करत आहेत. यामुळे, या प्रकरणांवरील निष्पक्ष सुनावणीसाठी त्यांना वकिलांसोबत चर्चेकरिता दोन अतिरिक्त व्हिडिओ कॉन्फरन्सची आवश्यकता आहे, असे केजरीवाल यांच्या वकिलाने म्हटले होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCourtन्यायालयjailतुरुंग