शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बहुविवाह, हलालाची वैधताही तपासणार, आणखी एक प्रथा रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 03:32 IST

बहुविवाह आणि निकाह हलाला या वादग्रस्त प्रथांचीही घटनात्मक वैधता तपासून पाहण्याचे ठरविले आहे

नवी दिल्ली: सात महिन्यांपूर्वी ‘तिहेरी तलाक’ घटनाबाह्य ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम समाजामधील बहुविवाह आणि निकाह हलाला या वादग्रस्त प्रथांचीही घटनात्मक वैधता तपासून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी पाच न्यायाधीशांचे विशेष घटनापीठ स्थापन केले जाणार आहे.बहुविवाह, निकाह हलाला, निकाह मुताह व निकाह मिस्यार या प्रथांच्या वैधतेस आव्हान देणाºया जनहित याचिकेसह चार रिट याचिका सोमवारी सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आल्या, तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने केंद्राच्या महिला व बालकल्याण, विधी व न्याय तसेच अल्पसंख्य व्यवहार मंत्रालयांना नोटिसा काढण्याचे निर्देश दिले. विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन विशेष घटनापीठाची विनंतीही मान्य केली. याचिकांत केंद्रीय विधी आयोगासही प्रतिवादी केले होते. मात्र त्याची गरज नाही, असे खंडपीठाने म्हटले.नवी दिल्लीतील समीना बेगम, अश्विनी कुमार उपाध्याय व नफिसा खान तसेच हैदराबादच्या मौलिम मोहसीन बिन हुसैन बिन अब्बाद अल खत्री यांनी यांच्या या याचिका आहेत. ‘मुस्लीम विमेन रेसिस्टन्स कमिटी’ला पक्षकार होण्यासाठी अर्ज करण्याचीही मुभा देण्यात आली.गोपाळ शंकरानारायणन मोहन पराशरन, व्ही. शंकर, साजन पूवय्या व या वकिलांनी या प्रथा घटनाबाह्य का ठरवाव्यात, याचे विवेचन केले. घटनापीठाने तिहेरी तलाकचा निकाल देताना हे मुद्दे जाणीवपूर्वक बाजूला ठेवले, हेही त्यांनी निदर्शनास आणले.काय आहेत या प्रथा?बहुविवाह : यात मुस्लीम पुरुषावर एकपत्नीत्वाचे बंधन नाही. त्यालाचार स्त्रियांशी विवाह करण्याची मुभा आहे.निकाह हलाला : आधी तलाक झालेल्या मुस्लीम स्त्री-पुरुषाला पुन्हा एकमेकांशी विवाह करण्यासाठी ही पद्धत आहे. अशा परिस्थितीत तलाकशुदा स्त्रीला दुसºया एखाद्या पुरुषाशी विवाह करून शरीरसंबंध ठेवावा लागतो. नंतर त्या पुरुषापासून तलाक घेतल्यावरच स्त्री आधी तलाक घेतलेल्या पुरुषाशी विवाह करू शकते. दरम्यानच्या काळातील हा कंत्राटी विवाह असतो. हे बंधन मुस्लीम स्त्रीलाच आहे. पुरुषाला ते नाही.याचिकांमधील प्रमुख मुद्देबहुविवाह व निकाह हलालामुळे मुस्लीम महिलांच्या कायद्याकडून समान वागणूक मिळण्याच्या, लैंगिक समानतेच्या व प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या घटनादत्त मुलभूत हक्कांची पायमल्ली होते. भारतीय दंड विधानाच्या कलम ४९४ नुसार पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह गुन्हा आहे. परंतु बहुविवाह प्रथेने मुस्लीम समाजासाठी ही फौजदारी तरतूद निरर्थक ठरते. पतीने दुसरा विवाह केला तरी पत्नी तक्रार करू शकत नाही. धर्माच्या आधारे मुस्लीम महिलांबाबत हा भेदभाव आहे. प्रथा मानवी हक्क व लैंगिक समानतेच्या संकल्पनांशी विसंगत आहेत.प्रथा कित्येकशतके रुढ असल्या तरी तो इस्लामी धर्माचरणाचा अविभाज्य भाग नाही. त्यामुळे त्या धार्मिक स्वातंत्र्यांच्या कक्षेत येत नाहीत.