शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे आणखी एक ड्रोन भारताने पाडले, पंजाबमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 07:40 IST

अमली पदार्थ व शस्त्रांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोन पाठविण्याचे प्रकार दररोज घडत आहेत.

अमृतसर : अमली पदार्थ व शस्त्रांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोन पाठविण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील फिरोजपूर क्षेत्रामध्ये बुधवारी रात्री घुसखोरी केलेले पाकिस्तानचे ड्रोन बीएसएफ जवानांनी गोळीबार करून पाडले. 

भारत व पाकिस्तानच्या सीमेवर पंजाबमध्ये हरभजन सीमा चौकीजवळ सीमेपलीकडून एका ड्रोनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले. जवानांनी गोळीबार करून हे ड्रोन पाडले. गुरुवारी सकाळी शोध घेतला असता ते एका शेतात कोसळल्याचे आढळून आले. या ड्रोनसोबत अमली पदार्थ किंवा शस्त्रांची पाकिटे होती का? याचा शोध घेण्यात येत आहे. थंडीत रात्री व सकाळच्या प्रहरात दाट धुके असल्याने त्याचा फायदा घेऊन सीमेपलीकडून ड्रोन भारतीय हद्दीत पाठविली जातात. 

यंदा ड्रोन घुसखोरीच्या २०० घटनायंदाच्या वर्षी पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर २००पेक्षा अधिक पाकिस्तानी ड्रोननी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले. गेल्या महिनाभरात आठ पाकिस्तानी ड्रोन बीएसएफने गोळीबार करून पाडली. पंजाबमधील अमृतसर, तरणतारण, फाजिल्का जिल्ह्यांत पाकिस्तान लगतच्या सीमेवर ड्रोन घुसखोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान