शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हनी ट्रॅप प्रकरणात लष्कराचा आणखी एक अधिकारी गुप्तचर यंत्रणांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 17:58 IST

मध्य प्रदेशमध्ये हनी ट्रॅप प्रकरणात लष्करातील एक लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिका-याच्या परिसरात छापा टाकण्यात आला आहे. त्यानंतर आर्मी इंटेलिजन्सच्या अधिका-यांनी त्याला ताब्यात घेतलं.

भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये हनी ट्रॅप प्रकरणात लष्करातील एक लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिका-याच्या परिसरात छापा टाकण्यात आला आहे. त्यानंतर आर्मी इंटेलिजन्सच्या अधिका-यांनी त्याला ताब्यात घेतलं. सूत्रांच्या माहितीनुसार, हा अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे. संशयित हालचालींच्या आधारावर गुप्तचर यंत्रणांनी जबलपूरमधल्या लष्करी वर्कशॉपमध्ये कारवाई केली होती. त्यानंतर अधिका-याला लष्कराच्या काऊंटर इंटेलिजन्स विंगद्वारे ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच कोणी अधिकारी या जाळ्यात अडकलाय, असं नाही.यापूर्वीही हवाई दलाच्या मुख्यालयातील एका ग्रुप कॅप्टनला कथित स्वरूपात हेरगिरी आणि संवेदनशील दस्तावेज मिळवण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं. हवाई दलाच्या सूत्रांनी तशी माहिती दिली होती. हा अधिकारी हनी ट्रॅपमध्ये तर अडकले नाहीत ना, याचा तपास अधिकारी तपास करतायत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा अधिकारी एक महिलेला संवेदनशील दस्तावेजांचे फोटो पाठवत असल्याचा तपास अधिका-यांना संशय आहे.तसेच पाकिस्तानकडच्या हेरगिरीचा तो एक भाग तर नाही ना, याचाही तपास सुरू आहे. हा अधिकारी एका अनधिकृत इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या मदतीनं बारीक हालचालींवर नजर ठेवून असल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर असं करण्याची कोणालाही परवानगी नाही. तो सोशल मीडियावर एका महिलेच्या संपर्कात होता. परंतु त्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. सद्यस्थितीत तो हवाईदलाच्या सेंट्रल सिक्युरिटी अँड इन्व्हेस्टिगेशन टीमच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या हालचाली काऊंटर इंटेलिजन्स सर्व्हिलान्सदरम्यान समोर आल्या आहेत. त्यानं संवेदनशील दस्तावेज मिळवण्याचा प्रयत्न केला असता, त्याला गुप्तचर यंत्रणांनी ताब्यात घेतलं आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान