विजय मल्ल्याविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट

By admin | Published: July 5, 2017 02:14 PM2017-07-05T14:14:54+5:302017-07-05T14:14:54+5:30

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या विरोधात विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

Another non-bailable warrant against Vijay Mallya | विजय मल्ल्याविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट

विजय मल्ल्याविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 5 - भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या विरोधात विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. आर्थिक अफरातफरी प्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे. मल्ल्याने थकवलेले पैसे आणि बँकांबरोबरच्या व्यवहार प्रकरणी सीबीआयने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. 
 
विजय मल्ल्या मार्च 2016 पासून लंडनमध्ये वास्तव्याला आहे. विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. त्याने त्याच्या किंगफिशर एअरलाईन्स कंपनीसाठी हे सर्व कर्ज घेतले होते. विजय मल्ल्याच्या अटकेसाठी भारत सरकार सध्या इंग्लंडमध्ये कायदेशीर खटला लढत आहे. 
 
उद्या लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण खटल्यासंबंधी सुनावणी होणार आहे. पण 6 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे मल्ल्याला सांगण्यात आले आहे. भारताकडून वेळेवर पुरावे सादर झाले नाहीत तर, डिसेंबरपर्यंत या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते. 
 
आणखी वाचा 
साडीचोर दिसला, मग विजय मल्ल्या दिसत नाही का ? सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं
युपीए-एनडीएच्या सामन्यात माझा झाला फुटबॉल - विजय मल्ल्या
विजय मल्ल्याच्या तोंडून ऐका, किंगफिशर बंद पडण्यामागची कारणे...
 
डिसेंबरपर्यंत आवश्यक पुरावे मिळाले नाहीत तर, एप्रिल 2018 पर्यंत हा खटला पुढे ढकलला जाऊ शकतो. विजय माल्ल्ल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर झाला आहे. 6 जुलैला न्यायालय पुरेसे पुरावे सादर झालेत की, नाही त्याचा आढावा घेईल. 
 
विजय माल्ल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. किंगफिशर एअरलाइन्स या आता बंद पडलेल्या विमान कंपनीच्या नावे त्याने हे कर्ज घेतले होते. दरम्यान मल्ल्याचे प्रत्यार्पण सोपे नाही. ईडीकडे असलेली कागदपत्रे ब्रिटनला पाठविली आहेत. त्यांच्या कायद्यानुसार प्रत्यार्पण मंजूर होताच मल्ल्याला परत आणले जाईल असे  परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी सांगितले.
 
सचिन जोशींनी घेतला विजय मल्ल्याचा बंगला विकत!
तीन लिलाव प्रक्रियेत अपयश आल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने विजय मल्ल्याचा गोव्यातील ‘किंगफिशर व्हिला’ हा बंगला अखेर विकला. अभिनेते व व्यावसायिक सचिन जोशी यांच्या मालकीच्या व्हायकिंग मीडिया आणि एंटरटेनमेंट या चित्रपट निर्माता कंपनीने ७३.0१ कोटी रुपयांत हा बंगला लिलावात विकत घेतला.विविध बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज वसूल करण्यासाठी स्टेट बँकेच्या वतीने बंगल्याचा तीन वेळा लिलाव करण्यात आला होता. मात्र तीनही वेळा बँकेला अपयश आले. 

Web Title: Another non-bailable warrant against Vijay Mallya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.