शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हनीप्रीतचं आणखी एक नवं नाव, बनावट नावाने चालवत होती फेसबुक अकाऊंट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 11:58 IST

बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत हिचं आणखी एक नवं नाव समोर आलं आहे.

ठळक मुद्देबलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत हिचं आणखी एक नवं नाव समोर आलं आहे. हनीप्रीत बनावट नावाने मोबाइल सिमकार्ड आणि फेसबुक अकाऊंट चालवत असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.

चंदीगड- बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत हिचं आणखी एक नवं नाव समोर आलं आहे. हनीप्रीत बनावट नावाने मोबाइल सिमकार्ड आणि फेसबुक अकाऊंट चालवत असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. हनीप्रीतला लोक प्रियंका तनेजा या नावाने ओळखत होती तसंच काही लोकांसाठी हनीप्रीतचं नाव गुरलीन इन्सा होतं. गुरलीन इन्सा असं हनीप्रीतचं तिसरं नाव आहे. हनीप्रीतच्या या तिसऱ्या नावाची आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. 

हरियाणा पोलिसांच्या एसआयटी पथकाकडून हनीप्रीतच्या या नव्या नावामागील खऱ्या कारणाचा तपास केला जातो आहे. हनीप्रीतने या खोट्या नावाने मोबाइल सिमकार्ड घेतलं होतं. नाव बदलून सिमकार्ड घेण्याच्या मागे काय कारण होतं? याचाही तपास सुरू आहे. 

इंडियना फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनमधील (आयएफटीडीए) हनीप्रीतचं सदस्यत्व संपलं आहे. संस्थेच्या प्रमाणपत्रावर हनीप्रीतने तिचा जो मोबाइल नंबर लिहाला होता तो नंबर गुरलीन इन्सा या नावाने रजिस्टर आहे. याच नंबरवरून हनीप्रीत फेसबुक अकाऊंटसुद्धा चालवत होती. या अकाऊंटला काही दिवसांपूर्वी डिलीट करण्यात आलं. हनीप्रीतच्या या नंबरची पडताळणी केल्यावर तो नंबर पानीपतचा असल्याचं समोर आलं. 

हनीप्रीत नाव बदलून फेसबुक अकाऊंट वापरत असावी, असा अंदाज सायबर तज्ज्ञांनी वर्तविला आहे. किंवा हनीप्रीतचा हा नंबर ज्या पत्त्यावर होता त्याने तो जीआय या नावाने सेव्ह केला असावा, असाही अंदाज वर्तविला जातो आहे. 

पोलिसांच्या हाती लागली हार्ड डिस्कदुसरीकडे, हनीप्रीत आणि राम रहीमची रहस्य उघड करणाऱ्या डेरा सच्चा सौदामधून पोलिसांना हार्ड डिस्क सापडली आहे. या हार्ड डिस्कमधून अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मते हनीप्रीतने 1.25 कोटी पंचकुलाच्या डेरा सच्चा सौदाच्या ब्रँचमध्ये दिले होते. पंचकुलामधील हिंसाचार आधीपासून निश्चित असल्याचं पोलिसांचं मत आहे. या सगळ्याच्या मागील मास्टरमाईंड हनीप्रीत होती. राम रहीमला दोषी ठरविल्यावर तेथे हिंसाचार घडविण्यासाठी हे पैसे दिले होते. राम रहीमचा चालक राकेश कुमार याने पोलीस तपासात याची कबूली दिली आहे.