शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Air India च्या विमानात पुन्हा किळसवाणा प्रकार, मद्यधुंद तरुणानं महिला प्रवाशावर केली लघवी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:05 IST

एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये २६ नोव्हेंबरच्या धक्कादायक घटनेच्या दहा दिवसांनंतर आता पॅरिस-दिल्ली सेक्टरमध्येही पुन्हा तोच किळसवाणा प्रकार घडला आहे.

नवी दिल्ली-

एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये २६ नोव्हेंबरच्या धक्कादायक घटनेच्या दहा दिवसांनंतर आता पॅरिस-दिल्ली सेक्टरमध्येही पुन्हा तोच किळसवाणा प्रकार घडला आहे. एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पण प्रवाशाने लेखी माफीनामा दिल्यामुळे संबंधित प्रवाशावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

एअर इंडियाच्या फ्लाइट १४२ मध्ये ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली होती अशी माहिती समोर आली आहे. विमानाच्या पायलटने या प्रकरणाची माहिती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला दिली, त्यानंतर त्या पुरुष प्रवाशाला अटक करण्यात आली होती. दरम्यान प्रवासी नेमका कोणत्या क्लासमधून प्रवास करत होता याची माहिती कळू शकलेली नाही. 

सकाळी ९:४० च्या सुमारास संबंधित फ्लाइट दिल्ली विमानतळावर उतरले आणि सुरक्षेला व्यवस्थेला घटनेची माहिती देण्यात आली होती. "एक पुरुष प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता आणि तो केबिन क्रूच्या सूचनांचं पालन करत नव्हता. त्यानं ऑनबोर्ड महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली", अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांने पीटीआय या वृत्तसंस्थेला  दिली आहे. आरोपी प्रवासी विमानातून उतरताच त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी पकडलं, परंतु नंतर दोन प्रवाशांनी "परस्पर तडजोड" झाल्यानंतर आणि आरोपीनं लेखी मागितल्यानंतर त्याला सोडण्यात आले.

महिला प्रवाशाने सुरुवातीला लेखी तक्रार केली होती पण नंतर तिनं पोलीस केस दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी प्रवाशाला इमिग्रेशन आणि कस्टम औपचारिकता पूर्ण केल्यावर विमानतळाच्या सुरक्षेने जाण्याची परवानगी दिली. ही घटना २६ नोव्हेंबरच्या घटनेच्या एका आठवड्यानंतर समोर आली आहे. याआधीही एका पुरुष प्रवाशाने न्यूयॉर्क-दिल्ली एअर इंडियाच्या विमानात एका महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे.

२६ नोव्हेंबर रोजीच्या घटनेत पीडित प्रवाशाने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथकं तयार केली आहेत.

आरोपी प्रवाशावर ३० दिवसांची बंदीएअर इंडियाने २८ डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले की, न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमान दिल्लीला येत होते. यावेळी एका प्रवाशाने दारुच्या नशेत बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या एका वृद्ध महिलेवर लघवी केली. या घटनेनंतर, एअर इंडियाने एक अंतर्गत समिती स्थापन केली आणि त्यांनी आरोपी प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये ठेवण्याची शिफारस केली. तसेच, प्रवाशाला 30 दिवस प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोषी आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया