शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक हिरे व्यापारी बँकांना बुडवून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 06:49 IST

नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे. हे नाव आहे प्रख्यात हिरे व्यापारी जतीन मेहता यांचे. जतीन मेहता यांच्यावरही बँकांची फसवणूक करून ६,७१२ कोटींचा कथित घोटाळा केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने केंद्र सरकारकडे याबाबतचा खुलासा मागितला आहे.काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांनी या कथित घोटाळ्यासंबंधी कागदपत्रे जनतेसमोर ठेवली आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१४ मध्ये मुंबईतील सीबीआय कार्यालय आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे जतीन मेहता यांच्या विनसम कंपनीविरोधात तक्रार करण्यात आली होती. यात बँकांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप करीत या संदर्भातील पुरावेही सादर केले होते. परंतु सीबीआय तसेच मोदी सरकारने यावर काहीही कारवाई केली नाही. पुढे साडे तीन वर्षे शांत बसल्यानंतर सीबीआयने ५ एप्रिल २०१७ कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ४ एप्रिल २०१७ रोजी तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने ही तत्परता दाखविली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या काळात मोदी सरकार शांत बसले होते, तपास यंत्रणाही डोळे बंद करून बसल्या होत्या, तिकडे जतीन मेहता आणि त्याची पत्नी सहजपणे भारतातून पळून गेले, इतकेच काय त्यांनी भारताचे नागरिकत्वही सोडून दिले.हाती आलेल्या माहितीनुसार जतीन मेहता आणि त्याची पत्नी सध्या टॅक्सचोरीसाठी नंदनवन मानले जाणाºया सेंट किट्समध्ये रहात आहेत. त्यांनी हा देश निवडला कारण भारताने सेंट किट्ससोबत प्रत्यार्पण करार केलेला नाही.नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्याप्रमाणे जतीन मेहताही बँकांची फसवणूक करून भारतातून पळून गेला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत पंतप्रधानांनी बाळगलेल्या मौनाबद्दल काँग्रेसने टीका केली आहे. ‘चौकीदार झोपला आहे का, त्याचा आवाज का निघत नाही, तो शांत का बसला आहे’, असा जाब काँग्रेसने विचारला आहे.

काँग्रेसचे मोदींना प्रश्नसीबीआयने तात्काळ गुन्हा का दाखल केला नाही?साडेतीन वर्षांनंतर गुन्हा का दाखल केला?ईडी, ईओडब्ल्यू आणि मंत्रालयाने साडेतीन वर्षे कारवाई का नाही केली?हे सगळे शांत बसण्यामागचे रहस्य काय?

टॅग्स :congressकाँग्रेस