ग्रेटर नॉयडा : सन २0३0 पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ग्रेटर नॉयडात आयोजित एका कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. हा कल येणाºया काही वर्षांत कायम राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.जगाची अर्थव्यवस्था सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली असताना भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड लवचिकता दर्शवित आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी ती जहाजाच्या नांगरासारखे काम करीत आहे. भारताची अर्थव्यवस्था अलीकडेच जगातील सहाव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. अलीकडेच जारी झालेल्या एकाअहवालानुसार, २0३0 पर्यंत भारत जगातील दुसºया क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.कच्च्या तेलाच्या किमतीबाबत मोदी यांनी सांगितले की,पेट्रोलियम पदार्थांबाबतआपल्याला जबाबदार किंमत धोरण अवलंबावे लागेल. उत्पादक आणि ग्राहक या दोघांचेही हित यात जोपासले जायला हवे.मानव जातीच्या इंधन गरजा भागविण्यासाठी आपल्याला तेल आणि गॅस या दोन्ही इंधनांबाबत अधिक पारदर्शक धोरणाकडे वाटचाल करावी लागणार आहे. (वृत्तसंस्था)अमेरिका तिस-या स्थानीसूत्रांनी सांगितले की, स्टँडर्ड चार्टर्ड या संस्थेने अलीकडेच जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, २0३0 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील दुसºया क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल.चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. अमेरिका तिसºया स्थानी फेकली जाईल.
भारत बनणार दुसरी मोठी अर्थव्यवस्था, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशावाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 01:19 IST