शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसांत आणखी एक हल्ला होणार होता; निवृत्त कमांडर ढिल्लन यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 10:00 IST

दोन दहशतवाद्यांच्या खात्म्यामुळे टळले संकट

श्रीनगर : १४ फेब्रुवारी २०१९च्या पुलवामा हल्ल्याच्या १० दिवसांत आणखी एक आत्मघाती दहशतवादी हल्ला होणार होता. याची कुणकुण भारतीय लष्कराला लागली होती. सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानींसह तीन दहशतवाद्यांना ठार करून दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला, असा दावा माजी चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) केजेएस ढिल्लन यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

‘कितने गाजी आये, कितने गाझी गए’ या पुस्तकात ढिल्लन लिहितात की, पुलवामा आत्मघाती हल्ल्यामागील हेतू स्पष्ट करण्यासाठी एका दहशतवाद्याने स्फोटके आणि इतर शस्त्रे दाखविणारा व्हिडीओ बनवला होता. या पुलवामा घटनेनंतर जैशचे दहशतवादी तुरिगाम गावात लपून हल्ल्याची योजना आखत होते. लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी २४ फेब्रुवारी १०१९च्या रात्री संयुक्त कारवाईची योजना आखली. संयुक्त पथकाने तीन दहशतवाद्यांना घेरले होते. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जम्मू-काश्मीरचे पोलिस उपअधीक्षक अमन कुमार ठाकूर यांनी जवान बलदेव राम यांना वाचवण्यासाठी स्वत:च्या सुरक्षेची पर्वा न करता जखमी सैनिकाला सुरक्षित स्थळी नेले. त्यात ते स्वत: गोळी लागून जखमी झाले. त्यांनी दहशतवाद्याजवळ जाऊन त्याला ठार केले. तो पाकिस्तानचा रहिवासी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी नोमान निघाला. 

असे हे शौर्य...ढिल्लन यांच्या पुस्तकात नायब सुभेदार सोमबीर यांच्या शौर्याचेही कौतुक करण्यात आले आहे. त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी ओसामाला समोरासमाेरच्या गाळीबारात ठार केले. डीएसपी ठाकूर आणि नायब सुभेदार सोमबीर या कारवाईत शहीद झाले. दोघांनाही शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला